Home बुलढाणा दिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम जयंती जगदंबा सार्वजनिक वाचनालय वानखेड मध्ये वाचन दिवस...

दिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम जयंती जगदंबा सार्वजनिक वाचनालय वानखेड मध्ये वाचन दिवस म्हणून साजरी

111

आशाताई बच्छाव

Screenshot_20231016-073011_WhatsApp.jpg

दिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम जयंती जगदंबा सार्वजनिक वाचनालय वानखेड मध्ये वाचन दिवस म्हणून साजरी
स्वप्निल देशमुख बुलढाणा
वानखेड : येथील जगदंबा सार्वजनिक वाचनालयात दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पि. जे. अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन करून आजचा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी दिनेश बाप्पू देशमुख अध्यक्ष जगदंबा सार्वजनिक वाचनालय यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना गजानन कर्णकार गुरूजी सहसचिव म्हणाले प्रत्येकाने वाचन केले पाहीजे. वाचनाने फक्त ज्ञान मिळत नाही तर भाषा देखिल समृद्ध होत असते. आजच्या युगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. मोबाईलच्या माध्यमातून ही पुस्तके उपलब्ध झाली आहेत, त्याचा उपयोग पालकांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण केली पाहीजे असे मान्यवरांनी मनोगतात सांगितले. यावेळी
रामकृष्ण भाऊ लोनाग्रे, दिनेश टोपरे, अमित भाऊ रंगभाल, देविदास भाऊ जोधेकर, असलम शेख, भगवंत कुलकर्णी, मारूती सांगळे,आदी उपस्थित होते.

Previous articleदेगलूर महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा संपन्न.
Next articleशेतकरी कामगार पक्षातर्फे मोफत चष्मे वाटप करणार जयश्री वेळदा – जराते यांच्या पुढाकारातून शिबिरांचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.