Home नांदेड देगलूर महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा संपन्न.

देगलूर महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा संपन्न.

70
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231016-072622_WhatsApp.jpg

देगलूर महाविद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा संपन्न.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर:-
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये UPSC व MPSC तसेच विविध स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण व्हावी, पदवी स्तरावरच शिक्षण घेत असताना विविध स्पर्धा परीक्षांची नियमित तयारी करून घेण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व करियर कट्टा या योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी स्वतंत्र ग्रंथालय, अभ्यासिका, इंटरनेट ब्राऊझिंग, करियर काँसलिंग, Telegram Channel, स्पर्धा परीक्षांचे नियमित अभ्यासवर्ग, तसेच कॅम्पस इंटरव्ह्यू इ. उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा या उद्देशाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित केलेली खुली सामान्य ज्ञान परीक्षा नुकतीच संपन्न झाली असून या परीक्षेत एकुण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम विशाल कुडकेकर, द्वितीय अनुक्रमे नितीन बायकेवार, दिपाली हसनाळे, सृष्टी हिंगोली तर तृतीय अनुक्रमे प्रतिक्षा भनगे, विरभद्र सुर्यवंशी हे विद्यार्थी आले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे पुस्तके बक्षिसांच्या स्वरूपात दिली जाणार आहेत. या प्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचे अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानी अभिनंदन केले आहे. सदरील योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी केले.सदरील स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ संजय देबडे, डॉ सुरेश काशिदे,प्रा.विनोद काळे, प्रा.साई रोट्टे प्रा. गणेश भगनुरे आणि पांडुरंग जाधव यांनी प्रयत्न केले.

Previous articleसप्तशृंगी देवीचा गड कळवण जि.नाशिक
Next articleदिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम जयंती जगदंबा सार्वजनिक वाचनालय वानखेड मध्ये वाचन दिवस म्हणून साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here