Home कोल्हापूर अर्पणा पोळ आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित

अर्पणा पोळ आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित

156

आशाताई बच्छाव

IMG-20220923-WA0024.jpg

अर्पणा पोळ आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित

पेठ वडगाव राहुल शिंदे: इंग्लिश मीडियम स्कूल असोशियन( इम्सा) च्या वतीने कोल्हापूर गणेश गडकरी हॉल येथे अर्पणा महेश पोळ यांना आदर्श मुख्याध्यापिका म्हणून आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये400 हून अधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा असून,
सहा हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत.यातील गुणवंतांना आदर्श शिक्षक तसेच आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अर्पणा पोळ ह्या पेठ वडगाव मधील जिनिअस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून 20 वर्षा पासून काम पाहत आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार जयंत आसगावकर होते, प्रमुख वक्ते शिक्षण तज्ञ डॉक्टर बी एम हिर्डेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, व प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या हस्ते शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी उपस्थित इम्साचे अध्यक्ष गणेश नायकुडे, नितीन पाटील, महेश पोळ, विल्सन वास्कर, सचिन नाईक, के. डी. पाटील, एन. एन. काझी आदी उपस्थित होते.

Previous articleनांदेड येथील आझाद ग्रुपच्या सोहळ्यास जिल्ह्यातील कार्यकत्यांनी उपस्थित राहावे — साईनाथ शिनगारे
Next articleराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.