Home जालना भुजबळ टार्गेट, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा 22 तारखेला, मनोज जरांगेंचा शब्द...

भुजबळ टार्गेट, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा 22 तारखेला, मनोज जरांगेंचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा

236

आशाताई बच्छाव

Screenshot_20231014-190706_Google.jpg

भुजबळ टार्गेट, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा 22 तारखेला, मनोज जरांगेंचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा
अंतरावली सराटी/जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क )-मराठा समाज एक होत नाही, हे बोलणाऱ्यांना आजच्या गर्दीनं दाखवलं जरांगे पाटील
जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उपस्थित आहेत. 100 एकरच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली होती. काल (शुक्रवारी) रात्रीपासूनच सभास्थळी मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती.
मनोज जरांगे पाटील यांचं भाषण
छत्रपती शिवाजी महाराज की… राष्ट्रमाता जिजाऊ माता की… मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो… घोषणांनी संपूर्ण सभास्थळ दुमदुमून गेलं आणि मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच जरांगेंनी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना खाली पाठवलं आणि सर्वांना सारखा न्याय असं ठणकावून सांगितलं. जरांगे पाटील म्हणाले की, व्यासपीठावरचे सगळे खाली जा, सगळ्यांना सारखा न्याय बाकीचे खाली बसलेत आणि तुम्ही इथं वर, मग मी जाईन हा तिथं, मी मराठ्यांत जात असतो मग खाली… असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी सर्वांना व्यासपीठावरुन थेट खाली धाडलं.
हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवरायांना वंदन करुन आणि उपस्थितांना प्रमाण करुन मनोज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली. मराठा समाज एक होत नाही, असं बोलणाऱ्यांच्या आज एकत्र जमून मराठ्यांनी मुस्काडात हाणली. कोण म्हणतो मराठा एक होत न्हाय…एक तर माझी अंत्ययात्रा किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल; लाख मराठ्यांसमोर मनोज जरांगे पाटलांनी भरला हुंकार!
एक तर माझी अंत्ययात्रा किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल; लाख मराठ्यांसमोर मनोज जरांगे पाटलांनी भरला हुंकार
एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुढील लढ्यासाठी रणशिंग फुंकले आहे.
आंतरवाली सराटी (जि. जालना) मराठा आरक्षणासाठी राज्यवापी एल्गार करत मनोज जरांगे पाटील यांनी आज (14 ऑक्टोबर) आंतरवाली सराटीमधून शिंदे फडणवीस सरकारला निर्णायक इशारा दिला आहे. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल, असे म्हणत त्यांनी पुढील लढ्यासाठी रणशिंग फुंकले आहे, आज आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांग पाटील यांच्या अतिविराट अशा सभेमध्ये त्यांनी लाखोंच्या जनसमुदायासमोर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा सरकार अल्टिमेटम दिला. आता दहावा दिवसांपेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नसल्याचा इशारा त्यांनी या भाषणातून दिला.
ते म्हणाले की, कायदा सांगतो व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या. शेती व्यवसायामुळे कुणबी प्रमाणपत्र दिली. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आज या मराठा समाजाच्यावतीने विनंती आहे की, सर्वांनी मिळून मराठा समाज आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्याचबरोबर ते म्हणाले की या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने सुध्दा सहभागी व्हावे असेही जरांगे म्हणाले.