Home भंडारा आनंदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात तिसरा तर नागपूर विभागात प्रथम

आनंदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात तिसरा तर नागपूर विभागात प्रथम

156

आशाताई बच्छाव

Screenshot_20231006-065054_WhatsApp.jpg

आनंदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात तिसरा तर नागपूर विभागात प्रथम

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी), दि. 5 :आंनदाचा शिधा वाटपात भंडारा जिल्हा राज्यात तिस-या तर नागपूर विभागात प्रथम क्रमांकावर आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांपैकी आतापर्यंत आनंदाचा शिधा 2 लाख 32 हजार 987 लाभार्थ्यांपैकी 2 लाख 30 हजार 352 पात्र लाभार्थ्याना हा शिधा वाटप करण्यात आला आहे. वितरणाचे प्रमाण 98.87 टक्के आहे.राज्यात सातारा,कोल्हापूर या जिल्हयानंतर भंडारा जिल्हयाने आनंदाच्या शिधा वाटपात आघाडी घेतली आहे.
तर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून फक्त 100 रुपयांत चार वस्तूंचा समावेश असलेल्या आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात येत आहे. या चार वस्तूंमध्ये 1 किलो रवा, 1 किलो हरभरा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल आदींचा समावेश असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले. या शिधा वाटपाच्या वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास जवळच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. वंजारी यांनी केले आहे. भंडारा जिल्हयात एकुण 889 स्वत धान्य दुकांनाव्दारे आनंदाचा शिधा वाटप सुरू आहे.त्यामध्ये भंडारा तालुक्यात 98.40 ,लाखांदूर 99.08, लाखनी 99.91, मोहाडी 98.98 ,पवनी 98.69 साकेाली 99.54,तुमसर 98.33 इतके वाटपाचे प्रमाण आहे.

Previous articleशेतकऱ्यांना भरपाई, जनतेला आनंदाचा शिधा देणारे संवेदनशील सरकार_.
Next articleसीएलसी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.