Home मुंबई लालबाग चा राजा गणेश मंडळाने छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान केला प्रकरणी मुंबई...

लालबाग चा राजा गणेश मंडळाने छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान केला प्रकरणी मुंबई मराठा क्रांती मोर्चा पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल.

154

आशाताई बच्छाव

IMG-20230916-WA0050.jpg

लालबाग चा राजा गणेश मंडळाने छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान केला प्रकरणी मुंबई मराठा क्रांती मोर्चा पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल.

मुंबई – ( प्रतिनिधी विजय पवार )
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राजाच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला, त्यांचा ह्या पाठचा नेमका हेतू काय होता? हे आम्हा शिव अनुयायीस कळत नाही. परंतु त्यांनी शिवराजमुद्रा लालबाग च्या राजाच्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांचा अवमान केला आहे. लालबागचा राजा (गणपती बाप्पा) देव जरी असले तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे देव देव्हाऱ्यात आहेत. आणि ही राजमुद्रा पायावर असणे मनाला पटत नाही. आपल्या स्वराज्याची राजमुद्रा मस्तकी लावावी पण पायावर पहायला मिळत आहे याची खंत वाटत आहे. कृपया आपण संबधित गोष्टीची खात्री करून लालबाग चा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करावा असा अर्ज ईमेल द्वारे मुंबई पोलिस आयुक्तांना केला आहे.

Previous articleआमदार रवी राणा यांनी किती पैसे दिले अन् आमदार यशोमती ठाकूर यांनी किती घेतले? आम. बच्चू कडू यांची चौकशीची मागणी.
Next articleचांदोरी येथील कुटुंब वत्सल बय आजी- रखमाबाई खालकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.