राजेंद्र पाटील राऊत
संपादकीय अग्रलेख….
व-हाणे प्रकरणात कुठे “ते” राजकारणी भामटे; अन सत्याच्या वाटेवर चालणारे सिताराम पगारे एकटे!
वाचकहो,
माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसते,तर फक्त श्वास असतो.अन मरतो तेव्हा त्याला श्वास नसतो तर त्याने केलेल्या कर्तबगारीचा नामोल्लेख म्हणून मागे फक्त नाव असते,हा जगाचा इतिहास कुणीच नाकारु शकणार नाही,आपण काय कमावले किती धनसंपदा कमावली त्यापेक्षा किती सत्कार्य सत्कर्म केलीत हाच नामोल्लेख मागे राहणार आहे.मात्र आम्ही इर्षा,व्देषबुध्दी,अहंकार व धनसंपदेच्या जोरावर नको तेवढे प्रत्येकाला अडचणीत आणण्याचे राजकारण खेळत राहिलो,पण…यापैकी आमच्या सोबत काहीच येणार नाही हे जीवनाचे अंतीम सत्य कुणीही नाकारु शकणार नाही,हरामाचा पैसा कमावून”कवडी कवडी माया जोडी,साधा न आया अधेला चल उड जा हंस अकेला” यापासून आम्हांला कुणीही वाचवू शकणार नाही.केलेले पाप येथेच फेडावे लागणार हे सत्य आपण कसे नाकारणार?पापाला माफ नसते अखेर येथेच किडे पडून सडून सडून मरायचे असते.तात्पर्य आजचा हा संपादकीय अग्रलेख लिहण्याचा उद्देश जरा साफ आणि स्पष्टच आहे.आम्ही सन २०२० पासून व-हाणे गावी आश्रयआशा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक व विधायक कार्यासाठी अवघी २५०० स्केअर फुट इतकी जागा संस्थेला मिळावी म्हणून संघर्ष करीत आहोत,लढाई लढत लढत आहोत,प्रत्यक्षात ती जागा आजही संस्थेच्या ताब्यात व वापरात असताना अनेक अडथळे आम्हांला या जागा प्रश्नांवर भामटया राजकारण्यांनी निर्माण करुन ठेवलेत.वास्तविक सदरची जागा कुणा एकाच्या बापाची नाही.शासनाच्या जागेवरुन राजकारण खेळणारे गावपुढारी आम्ही जसे त्यांच्याच खासगी मालमतेत हिस्सा मागत आहोत या हेतूने पावलोपावली अडथळा आणत आहेत.भामटेगिरी करायलाही काही ताळमेळ व मर्यादा असतात,एका बाजुला बोगस व खोटे नाटे कामे करायचीत अन दुसऱ्या बाजुला सामाजिक कार्यासाठी आमच्या सुरु असलेल्या जागा मागणीच्या कार्याला कुत्र्यासारखी शेपूट वाकडी करुन अडथळा आणायचा हे कसले राजकारण? माणसाने मेल्यावरही त्याचे नाव जनसामान्याच्या ओठी घेतले जाईल अशी स्वर्गिय तुकाराम (भाऊ) शंकर पवार यांच्या सारख्या पुढारपणाची कर्तबगारी करावी,फक्त गावपुढारपण करताना आम्हीच खरे गावाचे विकासपुरुष असा टेंभा मिरविताना आपण गावात काय काय दिवे लावलेत.गावाला कसे अतिक्रमणाच्या विळख्यात ढकलले याचेही आत्मपरिक्षण भामटया राजकारण्यांनी जरुर करावे.शासकीय जागा सामाजिक कार्याला देण्यासाठी तीन वर्षात अनेक अडचणी व अडथळे निर्माण करणाऱ्या भामटया पुढा-यांना काही स्वतःच्या बापजाद्याची संपती संस्था नावावर करुन मागत नव्हती मग हा व्देष,तिरस्कार,अहंकार कशासाठी? अखेर अहंकारच विनाशाचा मुळ ठरतो याचे बहुतेक भामटया पुढाऱ्यांना पुरेसे ज्ञान अथवा आकलन नसावे?
सत्याच्या वाटेवरील सिताराम पगारेंचा आदर्श भामटया पुढाऱ्यांनी जरुर घ्यावा!
सटाणा तालुक्यातल्या नवी धांद्री (यशवंतनगर) येथील पंच्याहतर वर्षीय प्रगतशील शेतकरी सिताराम सोनू पगारे यांनी आश्रयआशा फाऊंडेशन व युवा मराठा परिवाराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राभर सुरु असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा बघून ते अक्षरशः भारावून गेलेत.व त्यांनी आपल्या खासगी मालकीच्या बागायती शेतीत सुमारे दहा गुंठे जमीन एकूण १० हजार ८९० स्केअर फुट इतकी जागा आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेला विधायक व सामाजिक कार्यासाठी दान देण्याबरोबरच बक्षीसपत्र करुन देण्याचा निर्णय घेतला.आम्ही कौतुक करतो व मनापासून अभिनंदन करतो सिताराम पगारेंचे एखादाच सिताराम सत्याच्या मार्गावर चालवून सामाजिक कार्याची जाण ठेवतो,फक्त दिखाव्याचे व खोटेपणाचे सामाजिक कार्य करीत असल्याचा बनाव मात्र करत नाही हे विशेष! भामटया व पोटभरु गावपुढा-यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासारखा हा आदर्श सिताराम पगारे यांनी प्रत्यक्षात खरा करुन दाखविला.गावागावात सिताराम यांच्या सारखा आदर्श व प्रेरणा घेणारे भामटे पुढारी जेव्हा खरे अर्थाने सामाजिक कार्याची जाण ठेवतील तेव्हाच खरे अर्थाने गाव विकासाची पंचसुत्री आत्मसात होईल.जी जागा आमच्या स्वतःच्या बापजाद्याची नाहीच ती शासकीय जागा सामाजिक कार्याला मिळूच नये म्हणून केवढा हा आटापिटा अन तंगडया ओढण्याचे कटकारस्थानी पाप..शेवटी पापाला माफ नसते एव्हढेच!






