Home संपादकीय सुवर्णा सांळुखेचा टोकडेतही अनोखा कारनामा! भाग- १

सुवर्णा सांळुखेचा टोकडेतही अनोखा कारनामा! भाग- १

189
0

राजेंद्र पाटील राऊत

20230828_180251-BlendCollage.jpg

संपादकीय अग्रलेख…
सुवर्णा सांळुखेचा टोकडेतही अनोखा कारनामा! भाग- १
वाचकहो,
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी खरोखरच हतबल झालेत की,मालेगांव तालुक्यात सुवर्णा सांळुखे नामक ग्रामसेविकेचा अंदाधुंद कारभाराला कुणीच लगाम लावू शकत नाही हे विशेष!एकंदरीत या तालुक्याची सगळी चाड व न्यायनिती बासनात गुंडाळून ठेवली की काय? अशी शंका आता प्रशासनाबाबत सामान्य नागरिकांना छळू लागली आहे.गाव विकासाची सुत्रे ज्याची हाती द्यायची,त्यानेच गावाचे कोटकल्याण करण्या ऐवजी राखरांगोळी करुन शासनाच्या नियम व अटींना गुंडाळून ठेवायचे हे किती दिवस चालणार? व-हाणे प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या सुवर्णा सांळुखेचा आता टोकडेतही अनोखा कारनामा काल उघडकीस आला.शासकीय सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी (दि.२७ आँगस्ट) रोजी टोकडे गावी बेकायदेशीरपणे ग्रामसभेचे आयोजन करुन,ग्रामसभा अर्ध्यातच सोडून ग्रामसेविका सांळुखे यांनी ग्रामपंचायतीतून पलायन केले.व्वारे प्रशासन! प्रशासनाच्या अकर्तबगारीची लक्तरे व अब्रु पार चव्हाटयावर येऊन ठेपली तरी प्रशासन सुवर्णा सांळुखेची तरफदारी कोणत्या हेतूने करीत आहे.सुवर्णा सांळुखेचा “गाँडफादर” नेमका कोण? की, प्रशासन देखील ठोस व कठोर कार्यवाही करण्यास धजावत नाही यामागील खरे गौडबंगाल काय? सुवर्णा सांळुखेंचा मालेगाव तालुक्यातल्या हाताणे,लेंडाणे,व-हाणे,नगाव,दहिवाळ येथील इतिहास प्रशासनाने तपासला तरी ग्रामसेविका म्हणून निश्चितच त्यांचे नाव सुवर्णक्षरात? नोंद करण्या एवढी नक्कीच त्यांची अकर्तबगारी गाजलेली आहे.टोकडेतील माहिती अधिकार कार्यकर्ते विठोबा ध्यानध्यान यांनी सुवर्णा सांळुखेवर दप्तर दिरंगाई कायद्याखाली कारवाईची मागणी केलेली आहे.तसे पाहता मालेगाव पं.स.चे गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन सुवर्णा सांळुखेवर तात्काळ तडकाफडकी निलंबित करण्याच्या कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यातच खरे हित असून,दुसऱ्याला वाचविण्यासाठी आपणच अडचणीत येऊ नये म्हणजे झालं.हाच वेंदे साहेबांना सबुरीचा सल्ला!
माणूस एकदा चुकला तर पुढे त्याच्या अंगी शहाणपणा येतो असे म्हटले जाते.पण…येथे तर सुवर्णा सांळुखे स्वतःच्या मनमानी प्रमाणे अगदी हिटलर सुध्दा लाजवेल अशाच पध्दतीने जाणून बुजून चुकांवर चुका करुन “गिनीज बुकात” जागतिक विक्रम नोंदविण्याच्या तयारीत असताना,प्रशासनाने का म्हणून त्यांचे पाप आपल्या माथी मारुन घ्यायचे? व-हाणे प्रकरणातही ग्रामसेविका सांळुखेनी ४ आँक्टोबर २०२१ च्या ग्रामसभेला गणपुर्ती पुर्ण नसतानाही बेकायदेशीर ग्रामसभा घेतली.आणि पदाचा गैरवापर करुन कर्तव्यात कसूर करुन सरपंचाला सुध्दा गोत्यात आणले.अशा ग्रामसेविकेच्या बेताल व स्वछंदी मनमानी कारभाराचा फटका अनेकांना बसलेला असूनही प्रशासनाचे डोळे नेमके कधी उघडणार आहेत.हाच मोलाचा सवाल सामान्य जनातून उपस्थित होत आहे.एव्हढेच!

Previous articleव-हाणे प्रकरणात वेंदेची (अ) कर्तबगारी भाग -५
Next articleव-हाणे प्रकरणात कुठे “ते” राजकारणी भामटे; अन सत्याच्या वाटेवर चालणारे सिताराम पगारे एकटे!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here