Home जालना जालना नगर परिषदेने व्दारकानगरात नागरी  सुविधा द्याव्यात,  अन्यथा उपोषण व्दारकानगर वासियांचे निवेदन

जालना नगर परिषदेने व्दारकानगरात नागरी  सुविधा द्याव्यात,  अन्यथा उपोषण व्दारकानगर वासियांचे निवेदन

144

आशाताई बच्छाव

IMG-20230703-WA0119.jpg

जालना नगर परिषदेने व्दारकानगरात नागरी  सुविधा द्याव्यात,  अन्यथा उपोषण
व्दारकानगर वासियांचे निवेदन
जालना/दिलीप बोंडे ब्युरो चीफ
जालना शहरातील नवीन मोंढ्याजवळील वार्ड क्रं. 1 व्दारकानगरमध्ये मंजुर  सी.सी. रस्ता ,भुमिगत नालीचे बांधकाम, साफसफाई, विद्युत पथदिवे व नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन सुरू करून, पाणीपुरवठा सुरूळीत करावा अन्यथा लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा व्दारकानगर वासियांनी दिला आहे.
याबाबत मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना शहरातील नवीन मोंढ्याजवळील वार्ड क्रमांक 1 व्दारकानगर हा भाग  आहे. या व्दारकानगरात अद्यापपर्यंत जालना नगर परिषेदकडून कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही नागरी सुविधेकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केले. व्दारकानगरात प्रवेश करतांनाचा पुलही ढासळला आहे. यामुळे पावसात पुर येवून जाता-येतांना मोठी दुर्घटना घडू शकते. नवीन मोंढ्याजवळील वार्ड क्रं. 1 व्दारकानगरमध्ये  मंजुर  सी.सी. रस्ता व भुमिगत नालीचे बांधकामासाठी 65 लक्ष रूपयांचा निधी मा. ना. रेल्वेमंत्री रावसाहेब पा. दानवे यांनी मंजुर करून आणला आहे. मात्र अद्यापपर्यंत याचे काम सुरू झाले नाही.
सद्या पावसाळ्याचे दिवस आहे.  पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर चिखल होतो व यामुळे नागरिकांना ये- जा करतांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नगर परिषदेचे विद्युत खांबावर पथदिवे नाही यामुळे परिसरात सतत अंधेरा राहतो.  चोर्‍या-चपाट्यांचे प्रमाणही वाढले आहे.  तसेच या भागात साफसफाई होत नसून, कचर्‍याचे ढिग आहे. येत्या 8 दिवसात जालना नगर परिषदेने नागरी सुविधा न पुरविल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर प्रविण बबनराव शिंदे, भाऊसाहेब बोबडे, देवराव पवार, संजय वरकड, राजु जोगदंड,

Previous articleदापोडी मध्ये साई मंदिर दत्त मंदिर मध्ये गुरु पौर्णिमा उत्सवात
Next articleगुरुवारी कॉग्रेस अंल्पसंख्याक भव्य मेळावा प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते उद्घाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.