Home बुलढाणा समृद्धी महामार्गावर एका खाजगी बसला भीषण अपघात;

समृद्धी महामार्गावर एका खाजगी बसला भीषण अपघात;

251

आशाताई बच्छाव

IMG-20230701-WA0007.jpg

श्री संजय वाघमारे पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी: समृद्धी महामार्गावर एका खाजगी बसला भीषण अपघात; महाराष्ट्रातील बुलढाणा या ठिकाणातील बस नागपूर वरून पुण्याला निघाली असताना, या बसला समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात घडला. ही बस नागपूरहून पुण्याला जात असताना हा अपघात घडला. 30 जून रोजी ही बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. हा अपघात समृद्धी महामार्गावर मध्यरात्री १:२२ मिनिटांनी घडला असे प्राथमिक अंदाज सांगितला जात आहे. या खाजगी बस मध्ये नागपूरचे १०, यवतमाळचे ३ व वर्धा तील १४ असे प्रवासी एकूण ३३ प्रवासी होते.या ३३ पैकी २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असे सूत्राने सांगितले. त्यापैकी ८ प्रवासी सुखरूप आहेत. राहिलेल्या प्रवाशांवरती बुलढाण्यातील सिविल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हि बस नागपूरहून निघाली असताना वर्ध्यात संध्याकाळी ७:३०ला प्रवासी बस मध्ये बसले. संध्याकाळी ८ वाजता ही बस यवतमाळला पोहोचली. अशाप्रकारे या बसचा प्रवास होत असताना हा दुर्देवी अपघात घडला. या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मुख्यमंत्र्यांनी ५ लाखाची मदत घोषित केले आहे. तर पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखाची मदत जाहीर केली.त्या ठिकाणी अमरावतीतील पोलीस निरीक्षक जयंत नाईक ही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताचे सविस्तर माहिती देण्यास सांगितले. एकूणच काय तर समृद्धी महामार्ग हा एक प्रकारे अपघाताचे जाळे झाले असे म्हणण्यात हरकत नाही. तेथील नागरिकांनी सांगितले आहे की समृद्धी महामार्गावरती नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे हा अपघात होत आहे. शासनाने या महामार्गावरती खूप कडक नियम करावेत असे त्यांनी या ठिकाणी विनंती केली.

Previous article। विठ्ठल नामाची शाळा भरली।।
Next articleसंपादकीय अग्रलेख.. कसले हे पुरस्कार अन कसले हे सत्कार?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.