Home जालना साध्वींचा मंगलमय आणि नयनरम्य प्रवेश सोहळ्याने उपस्थित दंग

साध्वींचा मंगलमय आणि नयनरम्य प्रवेश सोहळ्याने उपस्थित दंग

300

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0051.jpg

!साध्वींचा मंगलमय आणि नयनरम्य प्रवेश सोहळ्याने उपस्थित दंग
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चातुर्मास-2023 चे आयोजन केले असून त्यानिमित्ताने स्वाधींचा मंगलमय आणि नयनरम्य प्रवेश सोहळ्याने जैन धर्मियांसह उपस्थित दंग राहिले. शिवाजी पुतळ्यानजीक असलेल्या पावन तपोधाममधील गुरु गणेश सभा मंडपात चातुर्मासाचे प्रवचन चार महिने श्रवण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. श्रमण संघीय आचार्य प. पू. डॉ. शिवमुनीजी म सा. या शुभ आशिर्वादाने शासन प्रभाविका आयंबील तप आराधिका महासती डॉ. श्री. पुनीतज्योती म. सा; तपसुर्या महामती निधीज्योतीश्रीजी म. सा. प्रवचन सम्राज्ञी डॉ. मुक्ताश्रीजी म. सा. तपचंद्रीका साध्वी विपुलजी म. सा; तपज्योत्सना स्वाधी मोक्षाजी म. सा; तपज्योत्सना सेवाभावी साध्वी वत्सलजी म. सा; साध्वी गौतमीजी म. सा; आणि साध्वी अर्हताजी म. सा. यांच्या सानिध्यात हा चातुर्मास होत आहे.
यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत साध्वींसह समाजातील पुरुष, महिला, युवक आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ही शोभा यात्रा  सकलेचानगर, बस स्थानक, मामा चौक, सुभाष रोड, टांगा स्टॅण्ड मार्गे गणेशनगरात विसर्जीत करण्यात आली. समाज बांधवांनी दैनंदिन प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष सुदेशकुमार सकलेचा आणि महामंत्री डॉ. धरमचंद गादिया तसेच विश्वस्त मंडळाने केले आहे.

Previous articleभीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जिल्हाप्रमुख सुभाष दांडेकर यांच्याकडून निषेध
Next articleफरशीवरून पाय घसरल्याने 16 वर्षीय युवतीचा मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.