Home पुणे तरुणीवर पुण्यात हल्ला…लेशपाल जवळगे.. या युवकांनी परतवून लावला.

तरुणीवर पुण्यात हल्ला…लेशपाल जवळगे.. या युवकांनी परतवून लावला.

180

आशाताई बच्छाव

IMG-20230627-WA0042.jpg

तरुणीवर पुण्यात हल्ला…लेशपाल जवळगे.. या युवकांनी परतवून लावला.

पुणे (सदाशिव पेठ ):-युवा मराठा न्यु प्रतिनिधी विलास पवार.
एरव्ही हल्ले होत असताना पब्लिक बघ्याच्या मोडमध्ये वा मोबाइल शूटिंग मोडमध्ये असतं! आज पुण्यात सदाशिव पेठेत वेगळं घडलं!
पेरू गेट चौकीनजीक पावन मारुती मंदिराजवळ हल्लेखोर आरोपी शंतनू जाधव याने सकाळीच ‘त्या’ तरुणीला गाठले.
तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीला अडवून त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला झिडकारले. तेव्हा त्याने लपवून ठेवलेल्या कोयत्याने तिच्यावर वार केले.
जखमी झालेली तरुणी त्याच्यापासून बचाव करण्यासाठी धावत सुटली.
त्या दरम्यान याच परिसरातील लेशपाल जवळगे हा तरुण स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिकेकडे निघाला होता. त्याने हा प्रकार पाहिला आणि आरोपी जाधवचा प्रतिकार केला.
अचानक झालेल्या प्रतिकाराने हल्लेखोर गडबडून गेला नि पळून गेला. दरम्यान रस्त्यावरील लोकांना काय घडतंय याचा अंदाज आला आणि त्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला.

एकतर्फी प्रेमातून हल्ला करून खून करण्याची साखळी निदान इथे तरी भंग पावलीय.
सर्रास अशा घटना घडताना आपण का मध्ये पडावं या भावनेने लोकांना ग्रासलेले असते, त्या भावनेला आज जोरदार तडा दिला गेलाय!
अन्यत्र कुठे अशा स्वरूपाची हल्ल्याची घटना घडली तर यापासून प्रेरणा घेऊन निदान विरोध करण्यास तरी पुढे येतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे!