Home नांदेड अपरा पेठ प्रकरणी गुंडांना तात्काळ अटक करा व लोहा शहरातील शिवकल्याण नगर...

अपरा पेठ प्रकरणी गुंडांना तात्काळ अटक करा व लोहा शहरातील शिवकल्याण नगर भागातील गोमांस विक्री करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करून बंदी घाला

140
0

आशाताई बच्छाव

IMG-20230627-WA0044.jpg

अपरा पेठ प्रकरणी गुंडांना तात्काळ अटक करा व लोहा शहरातील शिवकल्याण नगर भागातील गोमांस विक्री करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करून बंदी घाला
अंबादास पाटिल पवार
लोहा /प्रतिनिधी
किनवट तालुक्यातील अपरापेठ येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर सशस्त्र हल्ला करून खून केल्याप्रकरणी जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिम गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन दि.(२६) जुन रोजी बजरंग दल शाखा लोहाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
सदर निवेदनात नमूद केले की, महाराष्ट्रातील लव्ह जिहादच्या घटना, अवैध गोवंश तस्करी आणि गोहत्या प्रचंड प्रमाणात वाढले असून त्यावर बंदी घालावी. किनवट तालुक्यातील अपरापेठ येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर सशस्त्र हल्ला करून खून केल्याप्रकरणी जिहादी प्रवृत्तीच्या मुस्लिम गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी. यासह अन्य घटनांतील गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी.
महाराष्ट्रातील सर्व कत्तलखाने बंद करण्यात यावेत. शहरातील शिवकल्याण नगर भागातील एका घरातील गोमस विक्री करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करून बंदी घालावी. बैल बाजार मैदानावर मंगळवारी आठवडी बाजारात गोमास विक्रीवर कायमची बंदी घालावी अशा आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्याकडून लोहा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री /उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे. त्याची प्रत लोहा नगरपरिषदेला ही देण्यात आली.
सदरील निवेदनावर अंबादास पाटील पवार वि.हि.प बजरंग दल तालुकाध्यक्ष लोहा,‌ गणेश पाटील कल्याण तालुका संयोजक,ता.मंत्री विशाल घंटे जैन यांच्या स्वाक्षऱ्या असून यांच्याबरोबर उपस्थित भाजपा विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष गणराज केंद्रे,संतोष पा,.कदम,राजेश पा. कुटे, संतोष वाळके, ज्ञानेश्वर वड, कार्तिक कल्याणकर, कृष्णा ताटे, रितेश उगले, अनिल रामतीर्थ, हरिदास पा. मोरे, सतीश पा.मोरे, बालाजी कापसे, सुमित ठाकूर सह अनेक हिंदू बांधव उपस्थित होते.

Previous articleतरुणीवर पुण्यात हल्ला…लेशपाल जवळगे.. या युवकांनी परतवून लावला.
Next articleभूसंपादन अडकलेल्या ठिकाणानी शिवरत्न कन्स्ट्रक्शनने केली पर्यायी व्यवस्था किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here