Home पुणे लोहगावात माहिती सेवा समिती करणार एकदिवसीय लाक्षणिक उपोषण.

लोहगावात माहिती सेवा समिती करणार एकदिवसीय लाक्षणिक उपोषण.

153

आशाताई बच्छाव

Screenshot_20230621-064220_WhatsApp.jpg

लोहगावात माहिती सेवा समिती करणार एकदिवसीय लाक्षणिक उपोषण.

लोहगाव,प्रतिनिधी धनराज खांदवे : –लोहगाव-वाघोली रस्त्यावर संतनगर परिसरात सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत कळस-लोहगाव-वाघोली-केसनंद या रा.मा.६८ चे काम सुरु आहे. या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे, तसेच मंजुर अंदाजपत्रकानुसार काम न झाल्याची तक्रार माहिती सेवा समितीचे सागर शिवाजी खांदवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती.

खांदवे यांच्या म्हणण्यानुसार इंडियन अॉईल पेट्रोल पंप ते दादाची वस्ती नजीक रस्त्याचे काँक्रिटीकरण पुर्ण झालेले असून त्याला काही ठिकाणी तडे गेलेले आहेत. तसेच या रस्त्यावर काम पुर्ण होण्याआधी खड्डेही पडलेले आहेत. अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वारंवार रस्त्याची दुरावस्था होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर कार्यवाही न झाल्याने, माहिती सेवा समितीच्यावतिने सोमवारी दि.१९/०६/२०२३ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

यासंदर्भात नुकतेच कार्यासन अधिकारी सुरुची बदले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही माहिती सेवा समिती एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे. दरम्यान यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता जान्हवी रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या आरोपांचे खंडन केलेले असून रस्त्याचे काम मंजुर अंदाजपत्रकानुसारच झालेले असल्याचे सांगितले. याबाबत खांदवे यांची प्रतिक्रिया विचारली असता, हा लढा कोण्या व्यक्ती विरोधात नसून समाजहिताचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले; तसेच वेळ पडल्यास न्यायालयीन लढा देणार असल्याचेही नमूद केले.

Previous articleएकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचल बांगडी.
Next articleगटसचिवांचे थकीत वेतन देण्याची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.