Home अमरावती एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचल बांगडी.

एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचल बांगडी.

120
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230621-063718_WhatsApp.jpg

एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचल बांगडी.
दैनिक युवा मराठा
वृत्तसेवा.
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती
अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची उचल बांगडी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेत हालचाली सुरू झाले आहेत. त्यामुळे आता एकाच ठिकाणी एक टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली होणार आहे त्या अनुषंगाने प्रशासनात सध्या जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांच्या बदलाचे सत्र नुकतेच आटले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या आपसी, विनंती व प्रशासकीय बदलांची कारवाई नुकतीच पूर्ण झाली. त्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागामार्फत एकच विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची उचल बांगडी करण्याच्या अनुषंगाने माहिती संकलन व विभाग आणि टेबल बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, बांधकाम, वित्त, पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य समाज कल्याण, पशुसंवर्धन, समाज कल्याण, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, शिक्षण पंचायत समिती अशी सर्व विभागात गेल्या पाच वर्षापासून अनेक कर्मचारी एकाच टेबलवर एकाच ठिकाणी बसून आपले कामकाज करीत आहेत. मात्र शासनाच्या धोरणानुसार एकाच विभागात सलग पाच वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे अंतर्गत टेबल बदल किंवा कार्यालय बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेने विविध विभागात गेल्या काही वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची उचल बांगडी करण्याच्या दृष्टीने माहिती संकलन करणे सुरू केले आहे लवकरच या कर्मचाऱ्यांची उचल बांगडी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रशासन कडून यासाठी केव्हाचा मूर्त काढला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Previous articleशरद पवार हे गद्दारीचे आदी पुरुष, आज त्यांचा…; भाजपा खासदार अनिल बोलण्याचा खोचक टोला.
Next articleलोहगावात माहिती सेवा समिती करणार एकदिवसीय लाक्षणिक उपोषण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here