Home बुलढाणा किसान सभेच्या वतीने पातुर्डा फाटा येथे निदर्शने!

किसान सभेच्या वतीने पातुर्डा फाटा येथे निदर्शने!

158

आशाताई बच्छाव

Screenshot_20230606-221459_WhatsApp.jpg

किसान सभेच्या वतीने पातुर्डा फाटा येथे निदर्शने!

विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपूर – दिनांक २६ ते २८ एप्रील अकोले ते लोणी शेतकऱ्याच्या पायी मोर्चा ला त्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकारने मोर्चाला लेखी आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची राज्य सरकारने त्वरीत अंमलबजावणी करावी. या व ईतर मागण्या पुर्ण करा यासाठी किसान सभेच्या वतीने पातुर्डा फाटा येथे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पिक विमा तातडीने शेतकऱ्यांचा खात्यात जमा करावा अतीवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत दयावी. वन जमिन कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावे करावी सर्वाना रेशन मधुन धान्याचा पुरवठा करावा. बियाणे व रासायनिक खतावरची सबसिडी वाढवून खते व बियाणेची किमती कमी करा, महीला कुस्तीगरांचे लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या बृजभुषन सिंह वर कठोर कारवाई करा .या मागण्यासाठी किसान सभेच्या राज्यव्यापी आंदोलनानुसार किसान सभेच्या वतीने दि ५ जुन रोजी पातुर्डा फाटा येथे प्रचंड घोषणा देत निदर्शने आंदोलन करन्यात आले आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ अनिल गायकवाड तालुका सचिव कॉ शेख अकबर यांनी केले. सागर पहुसकर ओम मुंडाले ,संतोष पाटील, शे जावेद, मुंकंद फेरण, शे मेहबुब, विश्वास तिवाणे आदी उपस्थीत होते.

Previous articleबंद पडलेली पोकरा योजना पुर्ववत चालु करा! कृषी आयुक्तालयाकडे प्रशांत डिक्कर यांची मागणी
Next articleजय अंबिका सहकारी संस्थेला मत्स्यव्यवसासाठी परवानगी द्यावी – भाजपा नेते गजानन जोशी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.