Home पुणे खेड तालुक्यात  वादळी वारा, गारपीट; पावसाने दाना दान,

खेड तालुक्यात  वादळी वारा, गारपीट; पावसाने दाना दान,

134

आशाताई बच्छाव

IMG-20230530-WA0043.jpg

खेड तालुक्यात  वादळी वारा, गारपीट; पावसाने दाना दान,
पुणे,(मयुर चव्हाण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) -खेड तालुक्यात दुपारपासून उन्हाच्या झळ्या कमी झाल्या होत्या पण ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत होता अखेर सोमवारी दिनांक 29 मे रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यात ठीक ठिकाणी व चाकण पंचक्रोशीत पावसाने दमदार हजेरी लावली. कुरूळी आणि चाकण मधील दावड मळा भागात गारांसह पावसाने झोडपून काढले सोमवारी सायंकाळी पावसाने सोसाट्याचा वारा गारपीट विजांच्या कडकडात हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने सर्वांची दाणादाण उडाली उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे अनेक भागात पावसाने दाना दान केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केले आहेत खेड तालुक्यातील कोयाळी येथे झाडावर वीज कोसळल्याची बाब समोर आली आहे. कोयाळी येथील दिघे भाडाळे वस्ती येथे झाडावर वीज कोसळल्याने झाडाने पेट घेतला, चाकण जवळील राक्षेवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात सुरेश लक्ष्मण राक्षे यांच्या घरासमोर रस्त्यावर झाड पडून राक्षेवाडी रोड बंद झाला होता, चाकण मधील दावडमाळा भागात गारांसह जोरदार पाऊस कोसळला उरुळी परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने जोडपून काढले, लगतच्या पंचक्रोशीत त्याचप्रमाणे कुरळी मोई परिसरात वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता, सुमारे दीड तास पावसाने या परिसराला झोडपून काढले.

Previous articleपालघर जिल्ह्याच्या आदिवासी कुटुंबांना न्याय देऊन पूनर्वसन करण्यासाठी सटाण्यात उपोषण सुरू
Next articleरस्ता साईटपट्टी सुधारीकरणाच्या नावाखाली करोडोची मलमपट्टी!!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.