Home बुलढाणा काटेल येथे अवकाळी वाऱ्याने भिंत कोसळुन दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू !

काटेल येथे अवकाळी वाऱ्याने भिंत कोसळुन दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू !

135

आशाताई बच्छाव

IMG-20230407-WA0100.jpg

काटेल येथे अवकाळी वाऱ्याने भिंत कोसळुन दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू !

p
संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथे दिनांक ७ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता च्या दरम्यान अवकाळी वादळामुळे येथील श्री गणेश रमेश बोरवार त्यांच्या राहत्या कवेलु मातीच्या घराची भिंत कोसळून त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीचा आकस्मिक अवकाळी वादळामुळे कोसळलेल्या भिंतीखाली दबून मृत्यू झाला असून दुसरी मुलगी नामे राधा गणेश बोरवार ती सुद्धा जखमी झाली असून मृत मुलीचे नाव कृष्णाली असे आहे. घटनेचा पंचनामा पोलीस पाटील व उपसरपंच यांनी केला असून तसा अहवाल तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे सुद्धा पाठवला आहे. मुलींचे वडील गणेश बोरवार हे काटेल येथील शांती नगरात राहतात येथे बरेचसे कुटुंब असे आहेत की ज्यांना मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. आणि खऱ्या अर्थाने असे कुटुंब शासनाकडून घरकुल मिळण्याकरिता पात्र असून सुद्धा अद्याप पर्यंत त्यांच्याकडे राहायला पक्के घर नसून जीर्ण अवस्थेत असलेल्या घरामध्येच राहावे लागते. तरी मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी संग्रामपूर पंचायत समितीकडे लक्ष घालून चिरीमिरी करून बऱ्याच धनाढ्य लोकांना घरकुलाचा लाभ देणे सुरू आहे. अशा नियमबाह्य कामाला लगाम लावावा व ज्यांना खऱ्या अर्थाने पक्के घर नाही, घरावर छत नाही, केव्हाही भिंती कोसळून अशा प्रकारे आकस्मिक मृत्यू होऊ शकतो. अशा लाभार्थ्यांना लवकरात लवकर आपल्या हक्काचं घर मिळवून द्यावं तसेच या अवकाळी वादळात भिंत पडून मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयाला योग्य ते मदत मिळवून द्यावी. व खऱ्या अर्थाने गोरगरिबांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

Previous articleअनुसूचित जातीच्या 861 संशोधकांना फेलोशिप नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका अन्यायकारक.
Next articleअवैद्य रेती वाहतुकीचे वाहनानुसार हप्त्याचा रेट फिक्स!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.