Home बुलढाणा अवैद्य रेती वाहतुकीचे वाहनानुसार हप्त्याचा रेट फिक्स!

अवैद्य रेती वाहतुकीचे वाहनानुसार हप्त्याचा रेट फिक्स!

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20230407-WA0094.jpg

अवैद्य रेती वाहतुकीचे वाहनानुसार हप्त्याचा रेट फिक्स!

[संग्रामपूरचे प्र.ना. तहसीलदार उकर्डे यांची अवैध्य वसुली टीम तगडी..]

विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपूर तालुक्यात काही निवडक ठिकाणी नदी नाल्यात अवैद्य रेती उत्खनन व वाहतूक चालू आहे त्यापैकी वान नदी व पूर्णा नदी हे अवैद्य रेती माफियांसाठी एका प्रकारे सोन्याची खदान असल्याने मंडळ अधिकारी पातुर्डा तथा प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांचेही माफियांकडून चांगभले होत आहे. गेल्या काही वर्षापासून पातुर्डा मंडळातील पूर्णा नदी असलेले आस्वाद येथे नदीपात्रात रेतीचे उत्खनन करून कोद्री मार्गे अकोल्या जिल्ह्यात रेती तस्करी ची वाहतूक रात्रंदिवस होत आहे. कारण आस्वद हे गाव बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचे गाव समजले जाते. या अवैद्य रेती उत्खनन व वाहतुकीकडे महसूल, पोलीस तसेच आर टीओ विभागाचे दुर्लक्ष दिसते. तसेच उकर्डे यांच्या मंडळात येणारे वानखेड व रिंगणवाडी येथे वाण नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती उत्खनन व वाहतूक व जेसीबी द्वारे वानखेड येथे मातीचे उत्खनन उकर्डे यांच्या संगणमताने चालू असते. विशेष म्हणजे रिंगणवाडी येथील नागरिकांना वरवर ते रिंगणवाडी हा रोड अरुंद असल्याने जीवावर उद्धार होऊन या अरुंद रोडवर प्रवास करावा लागतो.कारण या रोडवर भरधाव वेगाने अवैद्य रेतीचे चालू असलेल्या वाहनांपासून केव्हाही अपघात होऊ शकतो. आणि या अवैद्य व्यवसायाची तक्रार केल्यास तक्रार करणाऱ्या नागरिकाच्या जीवित्वास रेतीमाफिया किंवा रेती माफियायांशी एकनिष्ठ असलेले हरीभाऊ उकर्डे यांच्याकडून धोका किंवा कटकारस्थान रचून खोटा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. त्यामुळे येथील नागरिकांची समस्या लक्षात घेता गोपनीय माहितीवरून संग्रामपूरचे तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी बऱ्याच वेळा महसूल पथका द्वारे रेती माफियांवर कार्यवाहीचा प्रयत्न केला परंतु रेती माफिया यांचे लोकेशन ग्रुप असल्याने रेतीमाफीयांना महसूल पथकाची माहिती मिळत असल्याने कार्यवाहीत अडथळे निर्माण होतात. म्हणून तहसीलदार गायकवाड यांनी रिंगणवाडी वान नदी च्या पुलावर पेंडॉल टाकून बैठे पथक सुद्धा चालू केले होते. त्यामुळे तेथील सामान्य नागरिकांना आता अवैध्य रेती बंद होईल अशी आशा होती. परंतु याही वेळेस अखेर रेती माफिया व त्यांच्याशी संबंधित असलेले मंडळ अधिकारी हेच जिंकले म्हणजेच पुलावरील पेंडॉल काढून टाकण्यात आले. कारण तेथे पूर्णवेळ अधिकारी थांबू शकत नव्हते. आणि रिंगणवाडी पुलावर रेती बंद करण्यासाठी पेंडॉल (चौकी) टाकल्यानंतर तहसीलदार गायकवाड यांना पत्रकार बोलतो म्हणून फोन यायचे व प्रश्न करायचे की तालुक्यात इतर ठिकाणी लक्ष न देता रिंगणवाडीतील चालू असलेल्या रेती माफियांवर अन्याय का.. “हे चालू द्या” असे म्हणणे त्या पत्रकारांचे होते अशी माहिती तहसीलदार यांच्याकडून मिळाली. परंतु खऱ्या अर्थाने पत्रकार असे अवैध धंदे चालू द्या असे खरे पत्रकार म्हणूच शकत नाहीत. असे फोन लावणारा तोतया पत्रकार किंवा माफियांशी संबंधित महसूल अधिकारी यांच्या वसुली टीमचा गावगुंड असू शकतो. कारण त्याचे आर्थिक नुकसान होत असल्याने हप्त्यापोटी पैसे मिळत नसतील म्हणून असा फोन लावला असेल. म्हणजेच जोपर्यंत अवैद्य रेती वाहतूक सुरळीत चालणार नाही तोपर्यंत उकर्डे यांना मलिदा मिळणार नाही. त्यामुळे उकर्डे यांचे कडून माफीयांना मिळणाऱ्या लोकेशन वरून फक्त काही मोजक्याच वेळी रेती वाहतुकीला वेळ मिळते. तालुक्यात महसूल चे पथक फिरत असल्याने बाकी वेळ रेती उत्खनन बंद ठेवावे लागते म्हणून पित्त खवळलेल्या रेतीमाफिया व मंडल अधिकारी उकर्डे व त्यांच्या वसुली टीमचे गावगुंड यांचे कडून अवैध्यरेती बाबतच्या तक्रार करत्यात किंवा बातमी प्रकाशित करणाऱ्यांच्या जीवाला धोका किंवा काही पोलिसांना हाताशी धरून खोटा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकते. कारण उकर्डे यांचे कडून असे बऱ्याच वेळ बोलले जाते. तरी मंडळ अधिकारी तथा प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांनी अवैध मार्गाने जमा केलेल्या वसुलीची चौकशी होऊन कारवाई व्हावी. तसेच चालू असलेल्या रेती उत्खनन व वाहतूकीवर उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.

Previous articleकाटेल येथे अवकाळी वाऱ्याने भिंत कोसळुन दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू !
Next articleलोहार समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघ होणे आवश्यक माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here