Home युवा मराठा विशेष युवा मराठा विशेष रात्रीचा गोंधळ बराच होता!ग्रामसेवकांची हमरीतुमरी(सांगण नही पन सांगण वन)

युवा मराठा विशेष रात्रीचा गोंधळ बराच होता!ग्रामसेवकांची हमरीतुमरी(सांगण नही पन सांगण वन)

298

आशाताई बच्छाव

Screenshot_20230120-174251_Google.jpg

युवा मराठा विशेष रात्रीचा गोंधळ बराच होता!ग्रामसेवकांची हमरीतुमरी(सांगण नही पन सांगण वन) वाचकहो,ऐकावे ते नवलच…ज्यांच्या हाती गाव विकासाची दोरी,ते गावाचे कल्याण करी…अशी ज्यांची ओळख असते अर्थातच ग्रामसेवक! पण…अगदी अलिकडेच नाशिक सारख्या पुण्यभुमीत ग्रामसेवकाच्या संघटनेतील पद निवडीवरुन अक्षरशः हमरीतुमरी झाल्याची चर्चा कर्णापकर्णी मोठया चवीने चर्चिली जात आहे.त्याचे झाले असे की,नाशिक येथे ग्रामसेवकाच्या संघटनेतील व पतसंस्थेवरील संचालक पदाविषयी महत्त्वाची बैठक “नाना”नी आयोजीत केलेली होती.मात्र मालेगांव तालुक्यातील ग्रामसेवकातच एकमत नसल्याने हे पद याचे गळ्यात टाकायचे की,त्याच्या गळ्यात घालायचे या रस्सीखेचीतच वादावादी सुरु झाली.अक्षरश शिव्यांची लाखोली वाहिली गेली.हमरीतुमरीवर आलेले हे प्रकरण अखेर कसे बसे शांत करण्यात आले.पण…”हि-यांच्या” गारगोटया झाल्याचे देखील यानिमिताने बघावयास मिळाले.तर तालुक्यातील ग्रामसेवकाचे नेतृत्व करणारे तालुकाध्यक्ष व नवनिर्वाचीत संचालक कुठे अपूरे पडले शेवटी हा प्रश्न उरतोच.मात्र यानिमिताने मालेगांव तालुक्याची चांगलीच नाचक्की ग्रामसेवकांनी नाशिक नगरीत करवून घेतली व स्वतःचे हसे करुन घेतले एव्हढे मात्र खरे!  (राजेंद्र पाटील राऊत)

Previous articleनाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटातील वादातून हवेत गोळीबार; जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार
Next articleएमपीएससीची २०२३ मधील मेगा भरती, ८ हजार १६९ पदांसाठी प्रक्रिया
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.