Home बुलढाणा दिव्यांग व्यक्तीवरील अत्याचारातील आरोपी तामगाव पोलीस स्टेशनला अटकेत.

दिव्यांग व्यक्तीवरील अत्याचारातील आरोपी तामगाव पोलीस स्टेशनला अटकेत.

104

आशाताई बच्छाव

IMG-20221223-WA0001.jpg

दिव्यांग व्यक्तीवरील अत्याचारातील आरोपी तामगाव पोलीस स्टेशनला अटकेत.

(स्वप्नील देशमुख युवा मराठा न्युज नेटवर्क)
संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथील दिव्यांग महिला स्वतःच्या शेतात काम करीत असतांना व शेताची पाहणी करत असतांना आरोपी यांनी त्या दिव्यांग महिलेला मारहाण तसेच लोटपात व अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व नंतर घरी येऊन घरात घुसून सुद्धा मारहाण केल्याच्या घटनेची दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी दिव्यांग महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगेश अढाव, पुरुषोत्तम अढाव व सुनंदा अढाव सर्व राहणार काकनवाडा खुर्द या आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 388/2022 भादविचे कलम 354, ३५४ ए, ४५२,३२३, २९४,५०६,३४ पोलीस स्टेशन तामगाव येथे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांनी दिव्यांग व्यक्ती संरक्षण कायदा 2016 चे कलम 92 लावले नव्हते सदरचे कलम हे लावल्यास आरोपींना विशेष न्यायालय समक्ष आरोपीस हजर करावे लागते मात्र पोलिसांनी केवळ आरोपींना वाचविण्याच्या दृष्टीने दिव्यांग व्यक्ती संरक्षण कायद्याचे कलम 92 हे आरोपीवर लावले नव्हते तसेच सदरचे प्रकरणात दिव्यांग व्यक्ती संरक्षण कायदा चे कलम 84 प्रमाणे केवळ विशेष न्यायालय यांना सदरच्या प्रकरणात न्यायनिर्वाळा व आदेश पारित करण्याचे अधिकार आहेत अशा प्रकारचे फिर्यादीने आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी आरोपींना पोलिसांनी अटक करून संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता विद्यमान संग्रामपूर न्यायालयात नाराजी पिटीशन एडवोकेट विद्यासागर अलोने व एडवोकेट निवृत्ती वाघ यांचेमार्फत दाखल केले. त्यावर प्रदीर्घ युक्तिवादानंतर फिर्यादी महिलेच्या नाराजी पिटीशन ची दखल घेत संग्रामपूर विद्यमान न्यायालयाने आरोपींचा रिमांड हा विशेष न्यायालया कडे वर्ग केला असून आरोपींना जामीन न देता प्रकरण विशेष न्यायालयाकडे वर्ग केले आहे. अशी माहिती फिर्यादी तर्फे वकील श्री विद्यासागर अलोने यांनी दिली असून सदर तिन्ही आरोपींना पोलीस स्टेशन तामगाव येथे अटकेत ठेवण्यात आले असून सदर आरोपींना रात्रभर पोलीस स्टेशन तामगाव येथेच जामीन न झाल्यामुळे ठेवण्यात आले व दुसऱ्या दिवशी आरोपींना विशेष न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलीस स्टेशन तामगाव येथून मिळाली त्यामुळे विशेष न्यायालय यावर काय आदेश करते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. दिव्यांग पीडितेच्या संदर्भात माहिती लपवण्या प्रकरणी दिव्यांग व्यक्ती संरक्षण कायद्याचे कलम 93 नुसार तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार उलेमाले व चौकशी अधिकारी कोल्हे यांच्यावर देखील होणाऱ्या दंडात्मक कार्यवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous articleभाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे पुण्यात निधन
Next articleसंग्रामपूर ते बोडखा रस्त्यावर असलेले झाडे झुडपे त्वरीत हटवा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.