आशाताई बच्छाव
मुंबईतील करी रोड येथील अविघ्न इमारतीत परत अग्निविघ्न!
विजय वसंत पवार
(युवा मराठा न्यूज नेटवर्क )
मुंबई शहराच्या करी रोड भागातील अविघ्न या हायराईज ६० मजली इमारतीत काल गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली.करी रोड येथील महादेव पालव मार्गावर असलेल्या ६० मजली अतिभव्य इमारतीच्या अविघ्न पार्क या इमारतीतील २२ व्या मजल्यावरील २०५ या बंद घरात आग लागल्याची हि घटना घडली,ही आग काही क्षणातच वेगाने पसरुन आगडोंब उसळला.या घटनेत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या इतर मजल्यावरील रहिवाश्यांना सुखरुप वाचविताना रामदास सणस,महेश पाटील हे दोन अग्निशमन विभागाचे अधिकारी जखमी झाले आहेत.तर कुठलीही मोठी दुर्दैवी घटना घडली नाही.अविघ्न या ६० मजली इमारतीत मागील वर्षीदेखील आग लागल्याची घटना घडली होती.






