Home पालघर पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद ग्रंथालयाचे उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद ग्रंथालयाचे उद्घाटन

154

आशाताई बच्छाव

IMG-20221203-WA0028.jpg

पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद ग्रंथालयाचे उद्घाटन

पालघर. ता; प्रतिनिधी. अमोल काळे

आज दिनांक ३/१२/२०२२ रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन रविंद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष , मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

नामफलकाचे अनावरण करून आणि लाल फित कापून हा उद्घाटन सोहळा सम्पन्न झाला.

यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांबद्दल सविस्तर माहिती घेतली तसेच ग्रंथालयातील पुस्तकांचा वाचकांना चांगला उपयोग होऊ शकतो असे मत व्यक्त केले.

ग्रंथालयात एकूण दहा हजाराच्या वर प्रति असून यामध्ये स्पर्धा परीक्षा, कादंबरी, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, थोर व्यक्तींचे चरित्र आदी पुस्तकांचा समावेश आहे.

सदर प्रसंगी अति.मु.का.अ.रवींद्र शिंदे, उप.मु.का.अ.( सा ) संघरत्ना खिल्लारे तसेच सर्व विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.