Home नांदेड मुक्रमाबाद येथे शिधापञीका कॕम्प लावून वाटप करण्याची इंसाफ मागणी ——————————– अनेक लाभधारकांना...

मुक्रमाबाद येथे शिधापञीका कॕम्प लावून वाटप करण्याची इंसाफ मागणी ——————————– अनेक लाभधारकांना डायरीवर धान्य घेण्याची वेळ

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20221130-WA0016.jpg

मुक्रमाबाद येथे शिधापञीका कॕम्प लावून वाटप करण्याची इंसाफ मागणी
——————————–
अनेक लाभधारकांना डायरीवर धान्य घेण्याची वेळ
——————————–
मुक्रमाबाद (प्रतिनिधी )
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद हे शहर तालुकास्तरावरचे असून या ठिकाणी वाढीव कुटुंबाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी चार स्वस्थ धान्य दुकान आहेत .मात्र दुकानदारांच्या माध्यमातून शिधापत्रिकेसाठी प्रयत्न होताना दिसत नाही.काही ग्राहाकांना साध्या डायरीवर धान्य घ्यावे लागत आहे. शिधापत्रिका नसल्यामुळे गोरगरीब नागरिकांना स्वस्त धान्यापासून मुकावे देखील लागत आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागते. तसेच मुक्रमाबाद हे शहर लेंडी प्रधान प्रकल्पामध्ये संपादित झालेले असल्यामुळे या ठिकाणी वाढीव कुटुंब सर्वेक्षणाचा मोठा प्रश्न असून येणाऱ्या काळात गरज भासल्यास शिधापञीका नसल्यामुळे अनेक कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ च्या वतीने मुखेड तहसीलदार यांना मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगृहात आठ दिवसीय शिधापत्रिका कॅम्प लावून या ठिकाणीच कागदपत्रे जमा करून घेऊन तात्काळ स्वरूपात गावातच शिधापत्रिका वाटप करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली. त्याला तहसीलदार यांनी दुजोरा देत आम्ही लवकरात लवकर राशन दुकानदारांना आदेशित करू असे आश्वासन निवेदन कर्त्यांना दिले आहे. या निवेदनावेळी ऑल इंडिया तन्जीमे इंसाफ चे जिल्हा समन्वयक जलील पठाण सामाजिक कार्यकर्ते खाजा शेख, मनान शेख युवक काँग्रेसचे शफी खुरेशी ,मोहसीन कोतवाल, जलील पटेल, साजिद शेख, सोहेल शेख, सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपालकमंत्र्यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद ग्रंथालयाचे उद्घाटन
Next articleअखिल भारतीय युवा प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमा साठी चामोर्शीतील अरबाज मुस्तफा शेख याची निवड ………!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here