आशाताई बच्छाव
आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील शालेय मुलांच्या शिक्षणाला अठराविश्वे दारिद्र्य
संतप्त पालकांनी शिक्षण विभाग दालनात भरवली विद्यार्थ्यांची शाळा
युवा मराठा वेब न्युज पोर्टल प्रतिनिधी रवि शिरस्कार, संग्रामपुर
तालुक्का संग्रामपुर लगत असलेल्या निरोड येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेत१ ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत. मात्र, वर्गावर एकच शिक्षक असल्याने गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे काल दि.10 ऑक्टोबर रोजी गावातील विद्यार्थ्यांसह पालक वर्ग यांनी पंचायत समिती शिक्षण विभागात आम्हाला शिक्षक द्या शिक्षक द्या अश्या घोषणा करत तब्बल 2 तास ठिय्या घातला होता आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुलांना इतर ठिकाणी शिक्षण घेता येत नाही त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.
गेल्या कित्येक वर्षांपासून अपुऱ्या शिक्षकांमुळे शालेय विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.निरोड गावातील लोकांनी वेळोवेळी शिक्षण अधिकारी संग्रामपुर यांना अनेकदा निवेदने सादर केली आहेत. त्यांना उडवा उडवी चे उत्तरे मिळाले आहेत.
आदिवासी बहुल म्हटल्या जाणाऱ्या संग्रामपूर तालुक्यात अशी परिस्थिती अनेक गावात झालेली आहे आधीच काळाच्या फातिम्यात कोरोना मुळे गत 2 वर्षे शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शिक्षणाचे फार मोठे नुकसान झाले आहे अनेक शाळांवर शासनाने शिक्षकांचे मंजूर पदे ठरले असुन शिक्षणाचा भार मूठभर शिक्षक सांभाळत आहे. दरम्यान तालुक्यात गेल्या चार वर्षापासून गटशिक्षण अधिकारी पद रिक्त आहे त्यामुळे अनेक वर्षापासून येथे केंद्रप्रमुखांसह शिक्षण विस्तार अधिकारी पदावर प्रभारी म्हणून काम चालू आहे गेल्या महिन्यात येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले
तालुक्यात केंद्रप्रमुख 10 पदे मंजूर असून 8 पदे रिक्त आहेत, मुख्याध्यापकांची 23 पदे मंजूर असून 13 पदे रिक्त आहेत, पदवीधर विषय शिक्षक 73 पदे मंजूर असून 17 पदे रिक्त आहेत, तर सहाय्यक शिक्षक 309 मंजूर असून 49 पदे रिक्त आहेत. तसेच सहायक शिक्षक,मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख,गटशिक्षण अधिकारी,यांसारखे अनेक पद रिक्त असुन, बऱ्याच ठिकाणी प्रभारी आहेत. त्यामुळे संग्रामपुर तालुक्यात मुलांच्या शिक्षणाची अठराविश्वे दारिद्र्य अशी गत होऊन बसली आहे.