Home परभणी दिवाळीनिमित्त 4 शिधा जिन्नस संचाचा लाभ घेण्याचे लाभार्थ्यांना आवाहन

दिवाळीनिमित्त 4 शिधा जिन्नस संचाचा लाभ घेण्याचे लाभार्थ्यांना आवाहन

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20221012-WA0004.jpg

दिवाळीनिमित्त 4 शिधा जिन्नस संचाचा लाभ घेण्याचे लाभार्थ्यांना आवाहन

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना दिवाळी निमित्त 4 शिधा जिन्नासांचा समावेश असलेल्या शिधा जिन्नस संचचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकाने त्यांचे तालूक्याचे संबंधीत स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडे शासन नियमानुसार देय रक्कम भरुन शिधाजिन्नस संच हस्तगत करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.
नियमित धान्य मोफत धान्य या व्यतिरिक्त हे अतिरिक्त पॅकेज अतिशय स्वस्त दरात मिळणार आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी आवश्यक शिधा जिन्नस संचाची मागणी पुरवठा विभागातर्फे संबंधीत कंत्राटदारांकडे नोंदविली आहे. तालुका गोदामांपर्यंत संच पोहोचविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे. विशेष म्हणजे एफएसएसआय मानंकाची पुर्तता करत असल्याचे एनएबीलएल अधिस्वीकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कंत्राटदाराकडून प्राप्त केल्यानंतर शिधा जिन्नस संच स्वीकारवेत अशा शासनाच्या सूचना आहेत.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब व तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील एपीएल (केशरी) शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधा जिन्नसाचा समावेश असलेला शिधा जिन्नस संच उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 4 ऑक्टोबर, 2022 च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे. तरी लाभार्थ्यांनी दिवाळीनिमित्त्‍ शिधा जिन्नस संचाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

Previous article“स्वयंसेवकांनी दत्तक घेतलेल्या गावात बालविवाह थांबविण्यास सहकार्य करावे” -जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल
Next articleआदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील शालेय मुलांच्या शिक्षणाला अठराविश्वे दारिद्र्य
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here