Home परभणी “स्वयंसेवकांनी दत्तक घेतलेल्या गावात बालविवाह थांबविण्यास सहकार्य करावे” -जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल

“स्वयंसेवकांनी दत्तक घेतलेल्या गावात बालविवाह थांबविण्यास सहकार्य करावे” -जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल

136

आशाताई बच्छाव

IMG-20221012-WA0005.jpg

“स्वयंसेवकांनी दत्तक घेतलेल्या गावात बालविवाह थांबविण्यास सहकार्य करावे” -जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी:-जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून ते प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांची बालविवाह प्रतिबंधक टीम तयार करून जिल्ह्यातील या स्वयंसेवकांना एक-एक गाव दत्तक देण्यात आले. तसेच आपला जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमासाठी बाल हक्क आयोग सदस्य ॲड. संजय सेंगर, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉ. आशाताई मिरगे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जगदीश नाईक, सामाजिक आर्थिक विकास संस्था केरवाडी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक समन्वयक तुकाराम फिसफीसे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कैलास तिडके, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण विशाल जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प आर.पी. रंगारी, बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण अरविंद आकात, अधीक्षक शासकीय मुलांचे बालगृह गोविंद अंधारे आदी मान्यवर या कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

Previous articleसुरजागड येथून खनिज वाहतूक करणाऱ्या ४० वाहनांवर कलम २८३ अंतर्गत कारवाई..!!
Next articleदिवाळीनिमित्त 4 शिधा जिन्नस संचाचा लाभ घेण्याचे लाभार्थ्यांना आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.