आशाताई बच्छाव
मालेगांव तालुक्यातल्या मास्तर पत्रकारांविरोधात करणार तक्रार दाखल; जि.प.च्या अशिमा मितल यांचेकडे!
मालेगांव,(प्रतिनिधी)- शासनाने एका अध्यादेशाव्दारे शासकीय कर्मचाऱ्यांना पत्रकारिता करता येणार नाही असे परिपत्रक काढलेले असतानासुध्दा मालेगांव तालुक्यात मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक विविध वृतपत्रात बिनबोभाट पत्रकारिता करुन गावागावात राजकारण करीत असल्याने याबाबत राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या वतीने येत्या सोमवारी नाशिक येथे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मितल यांचेकडे लेखी तक्रार दिली जाणार आहे. याबाबतीत माहिती अशी की,मालेगांव तालुक्यातील शिक्षक सुमीत बच्छाव,संदीप पगार पाटील व अन्य शिक्षक हे आपला शिक्षकी पेशा सांभाळून शासनाशी एकनिष्ठ राहून कर्तव्ये न करता गावागावात पुढाऱ्यांच्या संपर्कात राहून मोठया प्रमाणावर पत्रकारिता करुन राजकारण करीत असल्यामुळे मालेगांवचे गटशिक्षणधिकारी तानाजी घोंगडे यांचेकडे माहितीचे अधिकारात तक्रार दाखल केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाने सकारात्मक कागदपत्रे उपलब्ध करुन दिल्याने याप्रश्नी आता महासंघाच्या वतीने प्रत्यक्ष लढा दिला जाणार आहे.