आशाताई बच्छाव
सरकार विरोधात नवरात्रित शेतकरी बांधवांसाठी 20 कि.मी पायपीट करीत अवतरली नवदुर्गा युवासेना युवती कु.प्रियंका जोशी
वासखेडी/धुळे दिपक जाधव – येथील विटाई ते साक्री तहसीलदार कार्यालयाचा 20 कि.मी.अतंराचा रस्ता पायपीट करून शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी युवासेना युवती कु.प्रियंका जोशी व त्यांची युवा युवती सेना नवदुर्गा रूपात थेट अवतरली मैदानात यासाठी त्यांनी आपल्या युवा नारी शक्तीचा जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवेदन देण्यासाठी अवतरली व तहसीलदार साक्री यांना निवेदन देण्यात आले,निवेदनात म्हटले आहे की,जास्त पाऊस झाल्याने संपूर्ण पिके पाण्याखाली गेलेली असुन या वर्षी सदरील शेतकरी आपल्या पेरणीचे देखील पैसे काढु शकत नाही,अशी बिकट परीस्थिती निर्माण झालेली आहे,पाऊसाने घातलेले थैमान हे पिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे,अशा बिकट परिस्थितीत शेतकरी राजा हवालदिल झालेला असुन शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करावेत,व तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आणि योग्य ती नुकसान भरपाई द्यावी ही प्रमुख यावेळी करण्यात आली,परंतु जर येत्या 7/10/2022 पर्यंत संपूर्ण साक्री तालुका हा जर ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास समस्त महिला बघिणी़ना नाईलाजास्तव आपल्या कार्यालया समोर उपोषणास बसावे लागेल,मग होणाऱ्या परीणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.प्रसंगी गंगु खैरनार, शोभा खैरनार, उषा खैरनार, कल्पना जोशी,उषा वाघ,पुष्पा हिरे,अर्चना हिरे,अल्का खैरनार, रोहीणी खैरनार, प्रतिभा भामरे आदींच्या निवेदनात सह्या ही होत्या तसेच रणरागिणी कु,प्रियंका जोशी या मोर्चा चे नेतृत्व करत्या युवा नारी ,युवा शक्तीचा जागर करत मोर्चा यशस्वीपणे पार करून इशारा देत मोर्चा चा यावेळी समारोप देखील करून पुढील इशारा देखील यावेळी देण्यात आला ,






