Home उतर महाराष्ट्र साक्री च्या गरीबांच्या हितासाठी झटणाऱ्या समाजसेविका सौ,जोशिला पगारीया यांना लातुर येथे स्वामी...

साक्री च्या गरीबांच्या हितासाठी झटणाऱ्या समाजसेविका सौ,जोशिला पगारीया यांना लातुर येथे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कडुन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220929-WA0060.jpg

साक्री च्या गरीबांच्या हितासाठी झटणाऱ्या समाजसेविका सौ,जोशिला पगारीया यांना लातुर येथे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कडुन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

वासखेडी/धुळे  दिपक जाधव – येथील मराठवाडा तील लातुर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशन चे राज्यव्यापी अधिवेशन ,मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान व अधिवेशन पुण्यश्री लॉन्स येथे यावेळी भरवण्यात आले होते.अधिवेशनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब प्रदीप खंडापुरकर यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माझी राज्यमंत्री संजयजी बनसोडे उपस्थित होते,
या अधिवेशनात समितीला अनुसरून चांगले काम करणारे समाजसेवकांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते,त्या पुरस्काराने साक्री येथील रणरागिणी तसेच गोरगरिबांच्या जनकल्याण हितासाठी निस्वार्थी सेवा देणार्या समाजसेविका सौ,जोशिला अमर पगारीया यांना राज्यस्तरीय स्वामी रामानंद तीर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात येऊन तो समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब प्रदीप खंडापुरकर यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला, त्यांचा हा समाजसेवा कार्याचा 71वा पुरस्कार आहे,त्यांना या आधी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,तसेच यावेळी त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्यकारणी अध्यक्ष म्हणून करण्यांत आली,प्रसंगी मंचावर राणीताई स्वामी, नाशिक जिल्हाध्यक्ष भिवानंद काळे,अनिल देसले,हितेश दाभाडे,अमोल भागवत,उपस्थित होते,सदरील अधिवेशनात 36जिल्हयातील अनेक पदाधिकारी सहीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, बाबासाहेब खंडापुरकर हे समस्त कार्यकर्ता यांना आपल्या मुलांसारखे मानतात हाच त्यांचा मोठा आदर्श आहे, यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली, प्रसंगी साक्री च्या सामाजिक क्षेत्रातील समाजसेविका सौ,पगारीया यांनी आपले विचार मांडत सांगितले की,आपल्या समिती मार्फत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री श्री, एकनाथराव शिंदे साहेब यांना निवेदन देवुन रस्त्यावरील मनोरूग्ण यांच्या संरक्षणासाठी कोणताही उपक्रम राबवावा तसेच त्यांना जनसामान्यांच्या प्रवाहातील उपयोगी सुधारणा करण्याची मागणी करून आपण ही लोक कल्याण योजना लागु करावी जेणेकरुन त्यांच्या सामाजिक भावनांचा आदर होईल हीच आमची सामाजिक अपेक्षा आहे,ही भावना यावेळी सौ,पगारीया यांनी व्यक्त केली,कार्यक्रमा प्रसंगी जळगाव महिला जिल्हाध्यक्ष सौ,माया कोळी,जिल्हाध्यक्ष महेश पाटील, अशोक सोनवणे, माजी सैनिक उल्हास दादा,योगेश दादा,राहूल पाटील, साक्री तालुका अध्यक्ष साहेबराव कारंडे,संगिता पाटील,सुवर्णा पाटील, आशा पाटील, आदी उपस्थित होते, राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सौ,पगारीया यांनी यावेळी आभार देखील मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here