Home नांदेड भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त उमरेकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे...

भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त उमरेकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे भव्य सर्व रोग निदान शिबिर संपन्न.

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220929-WA0072.jpg

भारताचे पंतप्रधान
माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त
उमरेकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे
भव्य सर्व रोग निदान शिबिर संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिनांक 29/09/2022 रोजी भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असून यात 520 रुग्णांनी लाभ घेतला सर्व रुग्णांचे (इ.सी.जी,शुगर,रक्तगट,बी.एम.डी-हाडातील ठिसूळता) सर्व मोफत तपासण्यात आले या शिबिरास डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर, डॉ.सोनिया सचिन उमरेकर, डॉ.गोविंद लोणे, डॉ.माधव ढगे, डॉ. राजीव राठोड, डॉ. विशाल पेदे, डॉ. चंद्रकांत देवसरकर, डॉ. ज्ञानेश्वर वैद्य, डॉ.राजेंद्र जाधव,डॉ. योगेश पाईकराव,
डॉ.अविनाश घोडके सर,डॉ. प्रमोद बारोळे सर्व तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.सदरील शिबिरास उद्घाटक म्हणून लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रवीण भाऊ साले जिल्हाध्यक्ष महानगर, प्रमुख उपस्थिती डॉ. अजित गोपछडे प्रदेश अध्यक्ष वैद्यकीय आघाडी, सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक मामा धनेगावकर,व्यंकट मोकले धर्मभूषण ऍड. दिलीप ठाकूर,मंडळ अध्यक्ष संतोष श्रीसागर, युवा आघाडी ग्रामीण अध्यक्ष किशोर देशमुख, ओबीसी मोर्चा अध्यक्ष व्यंकटेश जिंदम ,उपाध्यक्ष अनिल सिंह हजारी,सोशल मीडिया प्रमुख राज यादव, दक्षिण विधानसभा अध्यक्ष बालाजी पाटील पुणेगावकर, विद्यार्थी आघाडी आदित्य शिरफुले, सुरेश लोट, बालाजी सूर्यवंशी,व इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. सदरील शिबिरास यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत कांबळे, प्रशांत व्यंगनकर, अच्युत शिरसाट, बालाप्रसाद वडजे, सुनील वाडेकर, बंडू मधेवाड, छाया चांदणे, त्रिशला बदलवाड, चेतन शिरसाट, किरण शिरसाट, भगवान वरपडे, प्रकाश वानखेडे, आकाश पवळे, लक्ष्मण अंबाडे, दिगंबर खासोळे, साहेबराव गुंडाळे, दादाराव गाडे, कोसर शेख,मारोती पाटील, लक्ष्मीबाई वावळे,संगीता सर्जे, नूसरत खान, गंगासागर होणंसांगडे, कविता ताटे, यांनी मेहनत घेतली सदरील कार्यक्रमाची प्रस्तावना आयोजक वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉ. सचिन संभाजी पाटील उमरीकर यांनी केली,खा.चिखलीकर साहेबानी उपस्थित सर्व रुग्णांना या शिबीराचा लाभ घ्यावा व सुंदर असा कार्यक्रम घेतल्या बद्दल डॉ. सचिन उमरेकर यांचे कौतुक केले. व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ साले यांनी सेवा पंधरवड्यात कशा पद्धतीने नांदेड जिल्ह्यात काम चालू आहे याची उपस्थित रुग्णांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मभूषण ऍड. दिलीप भाऊ ठाकूर यांनी केले व समारोप उपाध्यक्ष अनिल सिंह हजारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here