Home बुलढाणा कुषी उत्पन बाजार समिती येथे शिवसेनेच्या सत्कार समारंभात तुफान राडा … हाणामारी

कुषी उत्पन बाजार समिती येथे शिवसेनेच्या सत्कार समारंभात तुफान राडा … हाणामारी

256

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0042.jpg

कुषी उत्पन बाजार समिती येथे शिवसेनेच्या सत्कार समारंभात तुफान राडा … हाणामारी                        बुलढाणा,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सुरू असलेल्या कार्यक्रमात शिंदे गटातील काही शिवसैनिकांनी येऊन तुफान राडा केल्याची घटना घडली आहे…
बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त जाहीर करण्यात आल्या, आणि या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम बुलढान्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख, सह संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात होताच शिंदे गटाचे काही शिवसैनिक अचानकपणे कार्यक्रमाच्या सभागृहात शिरले आणि कार्यक्रम उधळून खुर्च्यांची तोडफोड सुरू केली, यादरम्यान शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना देखील लोटपाट करून मारहाण करण्यात आली…
जवळपास पंधरा ते वीस मिनिटं चाललेल्या या राड्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत घटनास्थळावरून काढता पाय घेतला..
त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला असून, घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील भेट दिली आहे, आणि राडा घालणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले,
एकंदरीतच आता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाची वैचारिक मुद्द्यावरची लढाई आता गुद्द्यावर आली आहे…

युवा मराठा वेब नयुज, करिता संपर्क -रविंद्र शिरस्कार, संग्रामपूर

Previous articleधांद़्री ब़्राम़्हणगाव जोडनारा शिवनाला अपुर्ण काम पूर्ण करा अन्यथा रास्ता रोको धांद़्री ग़्रामपंचायत ग़्रामस्थ आंदोलच्या तयारीत
Next articleगणेश मंडळातर्फे कमळेवाडीत आरोग्य शिबिर संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.