Home पुणे श्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार आगमन!

श्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार आगमन!

170

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0030.jpg

पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत नागणे:        श्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार आगमन! खामगाव फाटा (रेल्वे गेट) श्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी यावर्षी गणपतीचे आगमन ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या मंडळांनी खूप उत्साह मध्ये या गणपतीचे आगमनाचे कार्यक्रम पार पडला. गणपतीची स्थापना करण्यासाठी या मंडळाच्या सभासदांनी ढोल ताशांचे नियोजन केले होते .कार्यक्रम पार पडत असताना पावसाचे आगमन झाले, अशा पावसाच्या आगमनामध्ये सुद्धा ढोल ताशाच्या गजरात सर्व सभासदाचा उत्साह गगनात मावेत नव्हता .असा आनंद प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ढोल ताशांचा गजरात कार्यक्रम पार पडल्यानंतर या ढोलताशांना, या मंडळाच्या सभासदांनी एक विशिष्ट बक्षीस देऊन त्यांचा सत्कार केला . तुम्ही आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. या सर्व सभासदांनी सांगितले की इथून पुढच्या काळामध्ये आम्ही गणपतीसमोर सामाजिक कार्यक्रम, समाजामध्ये प्रगतीचे व सामाजिक संदेश देण्याचे कार्यक्रम राबविण्यात येतील. विविध प्रकारच्या स्पर्धा, लहान मुलांच्या कलागुणांना बळकटी मिळण्यासाठी सुद्धा कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर महिलांचे घरगुती कार्यक्रम,होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम घेतले जातील, असे यांनी सांगितले. एकंदरीत काय खामगाव फाटा, रेल्वे गेट शेजारील श्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी सांगितले की इथून पुढे, पुढील काळामध्ये गणपती उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपली जाईल.

Previous articleलखमापूरच्या पाटकॅनाल जवळील सप्तश्रृंगी देवी मंदिरात धाडसी चोरी.             
Next articleऔरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यासमोर एका महिलेने पेटवून घेतले!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.