Home बुलढाणा अतिवृष्टी सर्वे यादीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नावे समाविष्ट करा! अन्यथा जास्तगाव येथील...

अतिवृष्टी सर्वे यादीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नावे समाविष्ट करा! अन्यथा जास्तगाव येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण..

137

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0055.jpg

अतिवृष्टी सर्वे यादीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नावे समाविष्ट करा! अन्यथा जास्तगाव येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण..

ज्ञानेश्वर पाटील दांदळे
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपूर:-तालुक्यातील जस्तगांव येथे गत दीड ते दोन महिन्यापूर्वी ढगफुटी व अतिवृष्टी झाल्याने जमीन व त्यातील उभे पीक खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र येथील कृषी साहाय्यक व तलाठी यांनी नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर न जाता अतिवृष्टीचे सर्वे केले त्यामुळे बरेचसे शेतकरी अतिवृष्टी सर्वे पासून वंचित ठेवले त्यामुळे अतिवृष्टीचे सर्वे पुन्हा करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा 30 ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा जस्तगांव येथील शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
सदर दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि कृषी सहाय्यक इंगळे, तलाठी पाटील, यांनी जस्तगाव येथे ढगफुटी व अतिवृष्टी झालेल्या शेतीच्या नुकसानीचे सर्वे बांधावर न जाता सर्वे करण्यात आले त्यामुळे जस्तगाव येथील बऱ्याचशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी सर्वे पासून वंचित ठेवले.
त्यामुळे पिकांचे झालेले नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वे पुन्हा करून आमचे सर्वे यादीमध्ये नावे समाविष्ट करावे व याची चौकशी करून सर्वे करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व अतिवृष्टी सर्वे पासून वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर 30 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करू असा इशारा तहसीलदार संग्रामपूर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. सदर दिलेल्या निवेदनावर कैलास पुंडे, अमोल शिंगोटे, मधुकर डोसे, सुरज डोसे, उषाताई राजेंद्र डोसे, ताई बाई दही, शारदा डोसे, गजानन डोसे तसेच इतर 50 ते 60 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.

Previous articleनांदगावला संत शिरोमणी संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी!
Next articleसभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.