आशाताई बच्छाव
आठवडी बाजाराच्या दिवशी मोताळ्यातल होतोय वाहतुकीचा खोळंबा!
रोडवर लागतात वाहनांच्या रांगांच्या रांगा नगर पंचायत व बोराखेडी पोलिसांच्ये नियोजनच नाही
युवा मराठा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
गुरुवारी मोताळा येथे मोठा आठ्वडी बाजार भरतो परंतु येथे पोलिसांची पुरेश्या प्रमाणात व्यवस्था केलेली नसल्यामुळे दर गुरुवारी येथे चोरीच्या घटना घडतात. तसेच वाहतुकीची मोठया प्रमाणात खोळंबा होतो. आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारात 45 मिनिट ट्राफिक जाम झाल्याने मोताळा – नांदुरा रोडवर जवळपास अर्धा की.मी. पर्यन्त वाहनांच्या रांगा लागल्या होत्या ;मात्र येथे ट्राफिक पोलिस किंवा नगर पंचायत प्रशासनाचे कर्मचारी हजर नव्हते. मोताळा हे तालुक्याचे ठिकाण आहे येथे दर गुरुवारी मोठा आठवडी बाजार भरतो या बाजारात जवळपास 70ते 80 गावातील नागरिक व व्यापारी बाजारासाठी येतात. या बाजारामध्ये मोबाईल तसेच मोटार सायकल व पैश्यानच्या चोरीच्या घटना घडतात. काही नागरिक बोराखेडी पोस्ट.तक्रार सुध्दा करतात ,परंतु त्या फिर्यादी अनेक वेळा ऑनलाईन केल्या जात नाही किंवा पोलीस प्रशासनाकडून तक्रार स्विकारल्याची पोच दिल्या जात नाही.नांदुरा रोडवर ग्रामीण रुग्णालय असल्याने या रुग्णालयात उपचाराची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा रुग्णांना 108 वाहनांमधून बुलढाणा येथे रेफर केल्या जाते, अश्या वेळी ट्रॅफिक जाम झाल्यास रुग्णांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागतात.बोराखेडी पोलिस प्रशासनाच्या वतीने मोताळा आठवडी बाजारात पोलीस चौकी बांधण्यात आली परंतु येथे पोलिसच नसतात. तसेच मोताळा नगर पंचायत प्रशासनाने बाजाराचे कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोडवर हात गाड्या वर दुकाने लावल्या जात असल्याने वाहतुकीच्या मोठया प्रमाणात घोळम्बा होतो .तर दुसरीकडे बोराखेडी पोलीस परश्यासंकडून पोलिसांची नियुक्ती केली नसल्यामूळे या बाजारामध्ये पोलीस नसल्यामुळे गुरुवारी अनेक वेळा ट्रॅफिक जाम झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे स्कूल बस , एसटी . बसेस ,ऑटो तसेच दुचाकी वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.या कडे मोताळा नगर पंचायत व बोराखेडी पोलीस पार्ष्यासनाने लक्ष्य देऊन मोताळा आठ्वडी बाजारामध्ये वाहतुकीचl खोळंबा होणार नाही,अशी व्यवस्था करण्याची मागणी मागणी जनता करीत आहे…






