Home गडचिरोली कोविड योद्धा मनुन श्रीराम सेवा समितीचा अहेरी नगरपंचायत तर्फे सत्कार..!!

कोविड योद्धा मनुन श्रीराम सेवा समितीचा अहेरी नगरपंचायत तर्फे सत्कार..!!

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20220820-WA0024.jpg

कोविड योद्धा मनुन श्रीराम सेवा समितीचा अहेरी नगरपंचायत तर्फे सत्कार..!!                                 आरमोरी,(लोकेश चिताडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

अहेरी शहरात मागील २ वर्षात कोरोना व पूरपरिस्थिती ह्या संकटकाळी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अहेरी नगरपंचायत तर्फे “कोविड योद्धा” मनुन सन्मानपत्र देऊन श्रीराम सेवा समिती,अहेरी ह्या स्वयंसेवी संस्थेचा सत्कार नुकतेच अहेरीचे तहसीलदार मा.ओंकार ओतारी साहेब तसेच अहेरीचे नगराध्यक्षा मा.रोजा करपेत यांच्या हस्ते करण्यात आले…!!
कोरोना संकटसमयी श्रीराम सेवा समिती, अहेरी तर्फे अहेरी शहर व परिसरात ४००० अन्नधान्याचे किट वाटप, अहेरी शहरात २ वेळ स्वखर्चाने जँतुनाशक फवारणी, रुग्णांना विविध प्रकारच्या औषधीचे मोफत वाटप, लसीकरण मोहिमेसाठी जनजागृती तसेच लसीकरण शिबीराला सहकार्य तसेच पूरपीडितांना ५०० ब्लॅंकेट व कपड्यांचे वाटप तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण श्रीराम सेवा समिती, अहेरी तर्फे करण्यात आले ह्या उत्कृष्ट सेवा कार्याची दखल घेत अहेरी नगरपंचायत तर्फे स्वतंत्र अमृतमहोत्सवी वर्षानिमित्याने समितीचा सत्कार करण्यात आले..!!
ह्यावेळी भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, मुकेश नामेवार, प्रशांत नामनवार, नगरसेवक विकास उईके सह श्रीराम सेवा समिती, अहेरीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!!

Previous articleआठवडी बाजाराच्या दिवशी मोताळ्यातल होतोय वाहतुकीचा खोळंबा!
Next articleमुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here