आशाताई बच्छाव
राजू श्रीवास्तवच्या ब्रेन डेड नंतर आता हृदय ही करत नाही काम नवी दिल्ली,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं ब्रेन डेड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर आता त्यांचं हृदय काम करत नाही असं डॉक्टरांनी राजू यांच्या कुटुंबियांना कल्पना दिली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होत नसल्यानं त्यांचा चेहरा काळा पडत चालला आहे. राजू यांच्या शरीराचा खालचा भाग कार्यरत आहे. त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना अजूनही व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर ठेवलं आहे. त्यांना बरं करण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली जात आहे. परंतु अद्याप त्यांच्या प्रकृतीमध्ये अपेक्षित अशी सुधारणा झालेली नाही. त्यांच्यावर १० ऑगस्टपासून उपचार सुरू आहेत. त्यांच्या हृदयात १०० टक्के ब्लॉकेज असल्याचं आढळून आले. ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्यानं डॉक्टरांनी राजू यांच्या हृदयात दोन स्टेंट लावले. त्यांच्या मेंदूची एक नस दबली गेल्याचं समोर आलं आहे. अशा कठीण परिस्थितीत श्रीवास्तव याना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल आहे.






