आशाताई बच्छाव
रात्र झाली तरी नांदगांव तहसील, कार्यालयावरील राष्ट्रध्वज तसाच नाशिक जिल्हात खऴबऴ
नांदगाव : प्रतिनिधी अनिल धामणे नांदगांव शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी ध्वजरोहण केल्यानंतर ध्वज संहिता पाळावी लागते. ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा तर सूर्यास्तावेळी उतरवावा. अशा प्रकारची ध्वजसंहीता असतानाही नांदगावच्या तहसील कार्यलयात ध्वज रात्री साडेदहा नंतरही खाली उतरविलेला नसल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी हे घडले आहे. चार वेगवेगळ्या उपोषणांनी येथील तहसील विभागासह वीज वितरण विभागाची लक्तरेही टांगली गेलीत. हे कमी होते की काय म्हणून अजून एक प्रताप केला गेलाय ?, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय.
खरंतर, हर घर तिरंगा यामाध्यमातून देशात प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जावा. ज्यातून देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होईल असा उद्देश होता. यावेळी सामान्य नागरिकांना तिरंग्या विषयी काही सूट देण्यात आल्या होत्या. मात्र सरकारी कार्यलय, सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज संहिता कायम होती. ज्या अनुषंगाने सूर्योदयाच्या वेळी ध्वजरोहन, तर सायंकाळी सुर्यास्ता वेळी ध्वज रीतसर खाली उतरवला गेला पाहिजे. मात्र नांदगाव तहसील कार्यालय प्रशासन इतकं निर्धास्त झालं की रात्री साडेनऊ वाजले तरी ध्वज खाली उतरणण्याचं भानच त्यांना राहील नाही. कदाचित येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टी साजरी करण्याच्या व्यसत्तेमुळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा विसर पडला असावा. अशी भावना आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान दोषींवर तात्काळ कडक कारवाई व्हावी अशीही मागणी केली जात आहे.