Home मुंबई शिंदे सरकार मंत्रीमंडळ

शिंदे सरकार मंत्रीमंडळ

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0054.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे     :४० दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शपथविधी पार पडला! आज उद्या आज उद्या करत करत असे चाळीस दिवसानंतर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळ मिळालं. त्यामध्ये १)मुख्यमंत्री यांच्याकडे नगर विकास खातं २)उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहखात, वित्त खाते असे दोन खाते मिळाले ३) सुधीर मुनगंटीवार यांना ऊर्जा व वनखाते मिळाले ४) गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा खात ५)उदय सामंत यांना गृह उद्योग खात ६) तानाजी सावंत यांना उच्च शिक्षण मंत्री ७) अतुल सावे यांना आरोग्य मंत्री ८) गिरीश महाजन यांना जलसंपदा मंत्री ९) दादा भुसे कृषी खात व रोजगार हमी खात १०) अब्दुल सत्तार अल्पसंख्यांक मंत्री ११) मंगल प्रभात लोंढा न्याय विकास मंत्री १२) विखे पाटील यांना महसूल खातं व सहकार खातं १३) चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम खात १४) संजय राठोड यांना ग्रामविकास खातं १५) दीपक केसरकर पर्यावरण मंत्री १६) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क खाते १७) सुरेश खाडे सामाजिक न्याय खाते १८) संदिपान देशमुख रोजगार हमी खात १९) रवींद्र चव्हाण गृहनिर्माण खाते २०) विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री अशाप्रकारे वीस जणांचं मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन झाले आहे. या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांना संधी नाही व अपक्षांना मंत्रिमंडळ सुद्धा स्थान दिलेले नाही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना एकही पद देण्यात आलेलं नाही हा स्त्री-शक्तीचा अपमान आहे असं संपूर्ण महाराष्ट्रातून बोलले जातेय.त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या महिला वर्ग नाराज आहेत. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आज खाते वाटपासाठी पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here