Home पालघर मनोर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

मनोर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

151

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0058.jpg

मनोर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.                                                              पालघर,( वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मनोर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते विविध पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यातआले.तसेच मनोर चे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे,श्री लोखंडे सर,पौर्णिमा ,किसन भूयाल ,दामोदर कासट यांच्या हस्ते क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा चौक येथे श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात आला तारपा,सांगड,गौरी नाच अश्या पारंपरिक कलापथकांचा आनंद घेत रॅली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मनोर येथे आल्यानंतर संतोष जनाठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच अस्याच उत्साहाने आपण 15 नोव्हेंबर राष्ट्रीय जनजाती गौरव दिन साजरा साजरा करावा तसेच देशाच्या महामहीम राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना विराजमान करून आदिवासी समाजाचा गौरव केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी एकता मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्ते नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous articleसोमपुर येथे जागतीक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण
Next articleउमेद ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.