Home नाशिक सोमपुर येथे जागतीक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण

सोमपुर येथे जागतीक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण

134

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0000.jpg

सोमपुर येथे जागतीक आदिवासी दिनानिमित्त वृक्षारोपण
ताहाराबाद,(प्रतिनिधी):- सोमपूर येथे 9 ऑगस्ट जागतीक आदिवासी दिनानिमित्त अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने व वनविभाग ताहाराबाद विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्रीकृष्ण पारधी साहेब व आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.प्रविण पवार यांच्या हस्ते भगवान वीर एकलव्य व क्रांतिकारक टंट्यामामा भील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर मा.पारधी साहेबांच्या हस्ते एक झाड लावुन वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली,त्यावेळी वनविभागाचे अधिकारी,ताहाराबाद व सोमपुर येथील समितीचे पदाधिकाऱ्यांसह तालुकाध्यक्ष मा.संदिपभाऊ गांगुर्डे यांनीदेखील वृक्षारोपण केले.तसेच समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मा.श्रीकृष्ण पारधी साहेब,वनविभागाचे अधिकारी तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांचा छोटेखानी सत्कार केला.घरटे मॅडमांनी सूत्रसंचालन करुन सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमासाठी आकाश पवार,निलेश भामरे,भावेश भामरे,प्रशांत भामरे,राजु जगताप, केशव राखपसरे,रमेश पवार, आदींसह पोलीस प्रशासन वनविभाग प्रशासन व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमुक्रमाबाद येथे कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख व संभाजी विद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा रॅली.
Next articleमनोर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.