आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला! शिंदे व फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला शुक्रवार ५ ऑगस्ट ला संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान राजभवनावरती शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. यामध्ये भाजपाचे ८ व शिंदे गटाचे ७ आमदार मंत्री पदाची शपथ घेतील अशी सूत्रांच्या माहितीनुसार समजले. त्यामध्ये महत्त्वाची मंत्रिपदे ही भाजपाकडे असणार आहेत असे खात्री सूत्राने सांगितली त्यामध्ये गृहमंत्री, वित्तमंत्री, अर्थमंत्री, आरोग्य मंत्री अशा प्रकारची मंत्रिपदे ही भाजपाकडे असणार आहेत.शिंदे गटाकडे नगर विकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, कृषी मंत्री पद, तंत्र उच्च शिक्षण मंत्री पद, शिक्षण मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री पद इत्यादी मंत्री पदे ही शिंदे गटाकडे असणार आहेत असे सूत्रांचे म्हणणे आहे. एकूणच शिंदे फडणवीस सरकारचे मंत्री मंडळाचा विस्तार होणार हे नक्की व महाराष्ट्राला प्रत्येक खात्यातले मंत्री व काम करणारे हक्काचे मंत्री मिळतील अशी खात्री या ठिकाणी लोकांना वाटू लागली आहे व नागरिकांना आपापल्या जिल्ह्यामध्ये लवकरच पालकमंत्री मिळतील अशी ग्वाही सरकारने दिली आहे व इथून पुढच्या काळामध्ये विकास हेच मूलमंत्र असणार आहे असे त्यांनी सांगितले. पाठीमागच्या काळामध्ये फडणवीस स्वतः निर्णय घेत होते मंत्री मंत्रिपदे कोणाला असायची, परंतु आता परिस्थिती बदलली आहे दिल्लीवरून दिल्लीवरून मंत्रिपदे कोणाला मिळणार याची शाश्वती मिळल्याशिवाय मंत्रीपदी कोणाला मिळतील हेही एक आश्चर्य असणार आहे फडणवीस कडे गृहमंत्री पद राहील की अन्य कुठले नेत्याकडे जाईल हा एक नवीन धक्काच असणार आहे.