Home उतर महाराष्ट्र सोनेगाव चे सुपुत्र अनिकेत कुलकर्णी यांची यिन केंद्रीय शिक्षण समितीवर निवड.

सोनेगाव चे सुपुत्र अनिकेत कुलकर्णी यांची यिन केंद्रीय शिक्षण समितीवर निवड.

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0028.jpg

सोनेगाव चे सुपुत्र अनिकेत कुलकर्णी यांची यिन केंद्रीय शिक्षण समितीवर निवड.                                       अहमदनगर,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)
नुकत्याच झालेल्या यिन कॉनक्लेव 2022 या कार्यक्रमात अनिकेत कुलकर्णी यांची यिन केंद्रीय शिक्षण समितीवर संघटक म्हणून शिक्षण समितीवर निवड करण्यात आली आहे. राज्यभरातील त्यांचे संघटनात्मक कार्य आणि युवक वर्गातील प्रसिद्धी बघत ही निवड झाली असून यामुळं त्यांना पुढं काम करण्याची संधी मिळाली आहे.
2 महिने चाललेल्या या निवड प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर यश मिळवत अखेर अनिकेत यांनी या समितीवर त्यांचे स्थान मिळवले. ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि सामाजिक कामाचा अहवाल अस या निवडीचे स्वरूप होते. अनिकेत कुलकर्णी यांचे सामाजिक काम, विद्यार्थ्यांपर्यंत थेट संपर्क आणि दांडगा अनुभव यामुळे त्याची हे नियुक्ती झाली आहे. यिन च्या माध्यमातून अनिकेत गेल्या 2 वर्षांपासून काम करत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. येत्या काळात शिक्षण समितीच्या माध्यमातून विद्यार्थी हितासाठी मोठ काम करू अस ते निवडीवर प्रतिक्रिया देताना बोलले.
या कार्यक्रमासाठी अभिजीत पवार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, तुकाराम महाराज यांचे वंशज सदानंद मोरे, सिनेअभिनेते सौरभ गोखले, महेंद्र सोनवणे, आदी दिग्गज मान्यवरांनी यावेळी या नेतृत्व करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन केले.

Previous articleमंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला! उद्या होणार शपथविधी…
Next articleजिल्हा परिषद पंचायत समितीचे गट गण रचना रद्द
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here