Home वाशिम सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्या ला काय महत्त्व ?

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्या ला काय महत्त्व ?

147

आशाताई बच्छाव

IMG-20220723-WA0008.jpg

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्या ला काय महत्त्व ?                                                    वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

वाशिम जिल्ह्यातील सापळी या गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार. यांनी उपस्थित केला प्रश्न.शासनाने पुन्हा थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला पण ग्रामपंचायत सदस्या ला काय महत्त्व मागच्या वेळी भाजप सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला आणि त्या वेळी झालेल्या बहुतांश ग्रामपंचायत मध्ये सरपंच एका गटाचे आणि सदस्य एका गटाचे निवडुन आले परिणामी दोन गटात सतत वादामुळे तालुक्यात अनेक गावा गावात विकास कामे थांबले असे दिसून आले जनतेतून निवडून आल्यावर सरपंचांनी मनमानी पणाने गावांचा कारभार करत कोणत्याही निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्या ना विश्वासात न घेणे सदस्या ना महत्व न देणे हम करे सो कायदा . स्वतः सरपंच ग्रामपंचायत जो कोणी कर्मचारी वर्ग असेल त्यांना हाताशी धरून विकासाच्या नावाखाली गुत्तेदारी करून मलीदा लादण्यात यशस्वी झाले ग्रामपंचायत च्या अनेक निर्णय प्रक्रियेतून सदस्या ना दुर ठेवले जात असल्यास सदस्या ना महत्व उरत नाही यामुळे निवडुन आलेल्या सदस्या मध्ये मोठी उदासीनता पाहण्यात मीळत आहे याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतून निवडीचा निर्णय रद्द केला होता परंतु सरकार बदलात शिंदे फडणवीस नविन सरकारने पुन्हा हा निर्णय घेतला यामुळे अनेक सदस्या मध्ये नाराजीचा सूर दिसुन येत आहे . सामाजिक कार्यकर्ते गजानन पवार पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न या मुद्यांबाबत ते थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मुद्दा पत्राद्वारे मांडणार आहेत.

Previous articleमहाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण
Next articleनायगाव तहसीलवर दिव्यांग, वृध्द, निराधार,शेतमजुर,यांचा मोर्चाने परिसर दणानला -चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.