Home बुलढाणा आषाढी एकादशी निमित्ताने शेंगाव पायदळ वारीतील भक्तांकरिता चहा पाणी वितरण सेवा लाभ

आषाढी एकादशी निमित्ताने शेंगाव पायदळ वारीतील भक्तांकरिता चहा पाणी वितरण सेवा लाभ

109

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0030.jpg

आषाढी एकादशी निमित्ताने शेंगाव पायदळ वारीतील भक्तांकरिता चहा पाणी वितरण सेवा लाभ

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील तरुण मंडळींचे आयोजन

युवा मराठा न्यूज व वेब पोर्टल रवींद्र शिरस्कार संग्रामपूर

महाराष्ट्रमध्ये ‘आषाढी एकादशी’ ला विशेष महत्त्व आहे परंपरागत समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी पंढरपुर वारीला सुरुवात झाली असुन,यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतात.त्यांना’ वारकरी’ तसेच वारकऱ्यांची पंढरपुर वारी’ असं संबोधले जाते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठलाचा जप करत पायी पंढरपूर वारीला जाण्याची परंपरा फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली असते .दरवर्षी भक्त पायदळ पंढपूरला जातात,मागील दोन वर्षात कोरोनाकाळात भक्तांची चुकलेली पंढरीची वारी यावर्षी हजारो भक्तांसह पंढरपूरला निघाली आहे.यंदा आषाढी एकादशी रविवारी 10 जुलै 2022 रोजी येत आहे
आषाढी एकादशी निमित्त ठिकठिकान वरुन पालखी घेऊन सगळे वारकरी भक्त या आषाढी एकादशीच्या शुभ दिवसापर्यंत पंढरपूरी पोहोचले असतात.आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी व्रत मानून भाविक आपापल्या आराध्य देवतेच्या दर्शनाकरिता निघत असतात बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि अख्या महाराष्ट्रातील उत्कृष्ट, नियोजनबद्ध, श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे
प्रत्येक आषाढी एकादशीला या भागातील सर्व भाविक श्रींच्या दर्शनाकरिता निघत असतात शेगाव येथे अफाट संख्येत मोठा उत्सव सोहळा सादर करण्यात येते त्याच प्रमाणे आषाढी एकादशीला भाविक भक्त शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाकरिता पायदळ वारी करीत असतात.

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावातील काही तरुण मंडळींनी आज मनार्डी फाटा येथे पायदळ दिंडीतील भक्तांकरिता चहा पानी सेवेचे आयोजन करून आपल्या महाराष्टाच्या परंपरेचा दिंडीचा वारसा जोपासला दिंडीतील टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयजय पायदळ दिंडी सोहळा “ओम गजानन नमो नमः”
श्री गजानन नमो नमः” च्या उच्चाराने”! श्री च्या दर्शनाकरिता शेंगाव कडे रवाना झाले तसेच दिंडीच्या या प्रवासात ठीक ठिकाणी भक्तांकरिता चहा ,फराळाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाला उपस्थित सर्व वानखेड येथील मंडळी
शरद जाधव,अमोल भोपळे,नितीन खेळकर
प्रवीण बाबुळकर,दिगांबर म्हसाळ,सत्यविजय जाधव,नितीन पांडे, उमेश शिरस्कार या सर्व मंडळींनी सदर दिंडीच्या पायदळ वारीतील भक्तांच्या सेवेचा लाभ घेतला

Previous articleजगन्नाथ ताराचंद कासलीवाल, इंग्लिश मेडियम मध्य आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्सव,मोठया प्रमाणावर साजरा
Next articleबालशिवाजी इंग्लिश स्कूल वानखेड फाटा येथे पंढरीच्या पालखीचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.