Home नाशिक जगन्नाथ ताराचंद कासलीवाल, इंग्लिश मेडियम मध्य आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्सव,मोठया प्रमाणावर साजरा

जगन्नाथ ताराचंद कासलीवाल, इंग्लिश मेडियम मध्य आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्सव,मोठया प्रमाणावर साजरा

114

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0020.jpg

,, जगन्नाथ ताराचंद कासलीवाल, इंग्लिश मेडियम मध्य आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्सव,मोठया प्रमाणावर साजरा
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे नांदगाव.दि.9जुलै2022,वार शनिवार येथील जे. टि कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. विठ्ठलाच्या गाण्यावर दिंडी उत्सवात साजरी करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अभंग गात ,पाऊली खेळत आपला उत्साह द्विगुणीत केला.मोठया,प्रमाणावर भगवे ध्वज फडकत होते कार्यक्रमाच्यावेळी स्कूलचे प्राचार्य श्री मणी चावला सर उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी मिळून केले होते.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा, संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य मणी चावला सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Previous articleनांदगाव तालुक्यात आईने सुपारी देऊन केला मुलाचा निर्घृणरित्या खुन..खळबळ!
Next articleआषाढी एकादशी निमित्ताने शेंगाव पायदळ वारीतील भक्तांकरिता चहा पाणी वितरण सेवा लाभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.