Home गुन्हेगारी नांदगाव तालुक्यात आईने सुपारी देऊन केला मुलाचा निर्घृणरित्या खुन..खळबळ!

नांदगाव तालुक्यात आईने सुपारी देऊन केला मुलाचा निर्घृणरित्या खुन..खळबळ!

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0025.jpg

नांदगाव तालुक्यात आईने सुपारी देऊन केला मुलाचा निर्घृणरित्या खुन..खळबळ!                         नांदगाव,(आनिल धामणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नांदगाव येथील ढेकु खुर्द गावात एक आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे चक्क जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या मुलाची सुपारी देऊन जीव ठार मारल्याच्या घटनेने नांदगाव हादरले आहे.

दिनांक 7 जुलै रोजी साडे 12 च्या सुमारास जनाबाई अप्पा पेंढारे हिने तिचा मुलगा जनार्दन अप्पा पेंढारे हा वेडसर असल्याने तसेच त्याला फिट सुद्धा येत असल्याने त्याचा होणारा त्रास कायमचा संपविण्यासाठी समाधान दौलत भड यास चक्क 15 हजार रुपयांची सुपारी देऊन घरातील लोखंडी पहारीने मुलगा जनार्दन पेंढारे याच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी करत जिवे ठार मारले व त्याचे प्रेत निळ्या रंगाच्या प्लास्टिक गोणीमध्ये भरून गोणीचे तोंड शिवून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने साईनाथ राठोड यांच्या शेतातील विहिरीमध्ये फेकून दिले अश्या पद्धतीने अत्यंत थंड डोक्याने आपल्या पोटच्या मुलाला फक्त त्याचा होणारा त्रास टाळण्यासाठी ठार मारणाऱ्या कलियुगातील आईला माता कसे म्हणावे असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक करत आहेत.

सदर प्रकरणी नांदगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 201/22 भादवी कलम 302,201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here