Home परभणी आसेगाव येथील पाणी पुरवठा बंद

आसेगाव येथील पाणी पुरवठा बंद

152

आशाताई बच्छाव

IMG-20220627-WA0009.jpg

आसेगाव येथील पाणी पुरवठा बंद

शत्रुघ्न काकडे पाटील :-ब्युरो चिफ ( युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा मागील चार ते पाच दिवसापासून बंद झाला आहे. महावितरणने वीज थकबाकीमुळे या पाणीपुरवठा योजनेच्या रोहित्राचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.
ऐन पावसाळ्यात निर्जळीला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. ज्यांची घरी बोअरवेल आहे, त्यांना याची अडचण नाही. मात्र सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी ग्रामपंचायत कार्यालयाने याकडे लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Previous articleयं.चं मु.वि.घेण्यात येत असलेला परिक्षा काॅफी मुक्त पद्धतीने.
Next articleनायगावात राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.