Home बुलढाणा आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने “इडा पिडा टळु दे...

आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने “इडा पिडा टळु दे बळीराजाचं राज्य येऊ दे” महाविकास आघाडीचं लुटारुंचं राज्य जाऊ दे याकरिता राज्यभर आज बळीराजाला साकडं घालण्यात आलं.

127

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0051.jpg

आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने “इडा पिडा टळु दे बळीराजाचं राज्य येऊ दे” महाविकास आघाडीचं लुटारुंचं राज्य जाऊ दे याकरिता राज्यभर आज बळीराजाला साकडं घालण्यात आलं.

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर)

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे शेतकऱ्यांवर आणि कष्टकरी जनतेवर आजवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडीला चोख उत्तर आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण केली गेली नाहीत किंवा शेतकरी हितासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. आणि फक्त जनतेची लुटमार सध्याच्या आघाडी सरकारने केली. उपेक्षित वर्गातील लोकांसाठी रयत क्रांती संघटना नेहमीच आपला बुलंद आवाज सरकार समोर मांडत आलेली आहे.
म्हणूनच या सरकारला कंटाळून महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्ग लुटारूंचं हे सरकार जाऊन कधी एकदा बळीराजाचं राज्य येईल आणि त्या राज्यात शेतकरी कष्टकरी सुखी असतील अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी हितासाठी लढणाऱ्या रयत क्रांती संघटना ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून चौकाचौकात तर ह्या सरकारच्या भकासकामांना कंटाळलेल्या शेतकऱ्यांकडून बांधा बांधावर “इडा पिडा टळु दे बळीचं राज्य येऊ दे” महाविकास आघाडी सरकारचं लुटारूंचं राज्य जाऊ दे याकरता रयत क्रांतीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाना पाटील व कार्यकर्त्यांन कडून बळीराजाला साकडं घालण्यात आले .

Previous articleउमराणेत ना नफा ना तोटा तत्वावर शालेय साहित्य विक्रीचे उदघाटन
Next articleभारतीय जनता पार्टी 25 जुन निषेध दिन,पदाधीकार्यांनी केल्या घोषणा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.