Home मुंबई शिवसेना एक पाऊल मागे येण्यास तयार, परंतु एकनाथ शिदेंच्या मनात काही वेगळेच…?

शिवसेना एक पाऊल मागे येण्यास तयार, परंतु एकनाथ शिदेंच्या मनात काही वेगळेच…?

118

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0016.jpg

शिवसेना एक पाऊल मागे येण्यास तयार, परंतु एकनाथ शिदेंच्या मनात काही वेगळेच…?

मुंबई : (अंकुश पवार, जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्यूज चॅनल अँड पेपर)

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, ही पक्षाच्या आमदारांची भूमिका असेल तर त्याचीही तयारी आहे. पण, त्यासाठी तुम्ही २४ तासांत मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट चर्चा करावी, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला.

बंडखोरांचा आग्रह मान्य करत पक्ष वाचवण्यासाठी एक पाऊल मागे घेत सत्तेवर पाणी सोडण्यास शिवसेना तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले. या भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत संशयाचे वातावरण तयार झाले.
‘वर्षां या मुख्यमंत्री निवासस्थानी गुरुवारी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक झाली. एकनाथ शिंदे यांच्या गटातून निघून पुन्हा मुंबईत कसे आलो, याची कथा शिवसेना आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी यावेळी सांगितली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तेव्हा आता आपण सर्वांनी राजकारणात कधी काही होईल ते सांगता येत नाही याचीच प्रतीक्षा आता सर्व महाराष्ट्राला पडली आहे. मग एकनाथ शिंदे यांना बंडखोर म्हणावे तर नव्हे एकनाथ शिंदे यांना धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना धरून अपेक्षित असलेले लोकनाथ हे सध्या एकनाथ शिंदे होताना दिसत आहेत कारण प्रत्येक पक्षात नाराज लोक असतातच परंतु ते सर्व पक्ष बदलून दुसरी कडे जातात ही राजकारणातला इतिहास आपण पाहिलेच आहे. परंतु आता एकनाथ शिंदे हे पक्ष न बदलता पक्षाची वैचारिक ता ढळू देता धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराला धरून पुढे कार्य करण्याचे व ते गेल्या अडीच वर्षात आमदारांना त्रास झाला किंवा आमदारांची कामे झाली नाहीत त्या आमदारांना सोबत घेऊन एक वैचारिक लढा देण्याचे काम एकनाथ शिंदे हे करत आहे. आता यामागे भाजप आहे की कोणाचा हात आहे हे येत्या काही दिवसात समजलं परंतु नवीन सरकार जरी आले तरी जनतेची कामे पटापट होतील आणि सुरळीत होतील अशी अपेक्षा पण येणार असेल तर करू.